राज्यसभेत संजय राऊत यांच्याकडून ठाकरे सरकारची पाठराखण, विरोधकांसह केंद्राला झापले - Maharashtra Mazaa

Latest

Wednesday, September 16, 2020

राज्यसभेत संजय राऊत यांच्याकडून ठाकरे सरकारची पाठराखण, विरोधकांसह केंद्राला झापले

https://ift.tt/eA8V8J

नवी दिल्ली - कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. ही लढाई पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातच लढत आहोत असं आम्ही पहिल्या दिवसापासून सांगितलं. महाराष्ट्रात सर्वात मोठी चिंता धारावीची होती. तिथं कोरोना पसरला असता तर काय झालं असतं याची कल्पनाच न केलेली बरी. मात्र तिथली परिस्थिती हाताळण्यात आम्हाला यश आलं. याचं कौतुक जागतिक आरोग्य संघटनेनंदेखील केलं.

सध्या अनेक आरोप राज्य सरकारवर केले जात आहे. ही राजकारणाची वेळ नाही. राज्यात हेल्थ वर्कर्सची भरती न झाल्याने राज्य सरकारला सातत्याने विचारलं जात आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, आमचं सरकार येऊन तर 5 - 7 महिने झाले. त्याआधी कोणाचं सरकार होतं? त्यांनी पाच वर्षात हेल्थ वर्कर्सची भरती केली असती तर आता कोरोनाच्या संकटात बरीच मदत झाली असती असं म्हणत राऊत यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. महाराष्ट्रात काय किंवा देशात काय जे काही कोरोना बाधित बरे झाले भाभीजी के पापड खाऊन बरे झाले का? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी केला. 

राज्यासोबत दुजाभाव केला जात असल्याची खंतही राऊत यांनी बोलून दाखवली. राऊत म्हणाले की, तुम्ही हिशोबाचं काय बोलताय? केंद्राने 1 सप्टेंबरपासून वैद्यकीय साधनांचा पुरवठा बंद केला आहे. यात पीपीई कीटसह अनेक गोष्टींचा समावेश आहे. याचा भार आता राज्य सरकारच्या तिजोरीवर पडत असून जवळपास 350 कोटी बोजा असल्याचं राऊत म्हणाले. 

कोरोनाच्या संकटात पीएम केअर फंडासाठी मोठ्या प्रमाणावर निधी गोळा करण्यात आला. तो कोणासाठी गोळा केला असा सवाल संजय राऊत यांना राज्यसभेत विचारला. हा निधी राज्यांसाठी असून तुम्हाला तो द्यावाच लागेल. जीएसटीची बाकी आहे निदान ती तरी द्या असंही राऊत यांनी म्हटलं. राज्य सरकार स्वत:हून लढा देत आहेत. मार्च महिन्यात महाराष्ट्रात कोरोना टेस्टिंगसाठी एक लॅब होती आता ती संख्या 405 वर पोहोचली आहे. कोरोनाशी सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे. शेवटचा कोरोना पेशंट बरा होत नाही तोपर्यंत हा लढा द्यावा लागेल असं राऊत म्हणाले. 



from News Story Feeds https://ift.tt/33AZoYn
via IFTTT

No comments:

Post a Comment