अरबी समुद्रात दिसली भारत-अमेरिका नौसेनेच्या मैत्रीची झलक; पाहा खास व्हिडिओ - Maharashtra Mazaa

Latest

Monday, September 14, 2020

अरबी समुद्रात दिसली भारत-अमेरिका नौसेनेच्या मैत्रीची झलक; पाहा खास व्हिडिओ

https://ift.tt/eA8V8J

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगल्याचे ऐकायला मिळत आहे. त्यानंतर आता अरबी समुद्रात दोन्ही राष्ट्रांतील संरक्षण स्तरावरील अतूट मैत्रीची झलक पाहायला मिळाली. भारतीय नौसेनेच्या महाकाय जहाजामध्ये अमेरिकन जहाजातून इंधन भरल्याचे समोर आले आहे. भारतीय नौसेनेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन अमेरिकन जहाजातून भारतीय जहाजामध्ये इंधन भरतानाचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 2016 मध्ये  भारत व अमेरिका यांच्यात द्विपक्षीय सामरिक सहकार्य करार झाला होता. या कराराअंतर्गत दोन्ही देशांच्या सेनादलांना एकमेकांचे तळ दुरुस्ती व इतर कारणांसाठी वापरण्याबरोबरच रसद पुरवठय़ाची तरतूद आहे. 

'कोरोना नैसर्गिक नसून सत्य लपवण्यासाठी चीनकडून मासळी बाजाराचा वापर'

'लॉजिस्टिक्स एक्स्चेंज मेमोरँडम ऑफ अ‍ॅग्रिमेंट (लिमोआ)' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कराराच्या अंतर्गत दोन्ही  संबंधित चित्र पाहायला मिळाले.  भारतीय नौसेनेच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्राच्या उत्तर दिशेला मिशनवर तैनात असलेल्या आयएनएस तलवार या भारतीय जहाजामध्ये लिमोआ कराराअंतर्गत अमेरिकन जहाजातून इंधन भरण्यात आले. भारताने अशाच प्रकारचा करार फ्रान्स, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि जापान या राष्ट्रांसोबतही करार केला आहे.  पीटीआय वृत्तसंस्थेन दिलेल्या माहितीनुसार, मागील काही वर्षांपासून भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण विषयी संबंध अधिकाधिक मजबूत होत आहेत. दोन्ही देशात 2018 मध्ये संरक्षणसंदर्भातील COMCASA म्हणजे कम्यूनिकेशन कॉम्पॅटिबिलिटी अँण्ड सिक्यॉरिटी अ‍ॅग्रिमेंट हा द्विपक्षीय करार झाला होता. 

शुक्रावर आढळल्या जीवसृष्टीच्या पाऊलखुणा; शास्त्रज्ञांना सापडले जैविक संयुग!

यावर्षातील जुलैमध्ये भारतीय नौसेना आणि अमेरिकन नौसेनेने अंदमान-निकोबार येथे सैन्य सराव केल्याचे पाहायला मिळाले होते. यावेळी अमेरिकेची उच्च दर्जाची आणि आण्विक शस्त्रांचा मारा करु शकतील अशी अमेरिकन एअरक्राफ्ट सराव ताफ्यात सहभागी झाल्याचे दिसून आले होते. भारताकडून 4 मोठी जहाजे या सरावात सहभागी झाली होती. 
 



from News Story Feeds https://ift.tt/33nbEeU
via IFTTT

No comments:

Post a Comment