न्यूयॉर्क - गेल्या सहा महिन्यांपासून जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणलेले असताना आर्थिक फटकाही मोठ्या प्रमाणात बसत आहे. कोविड आणि लॉकडाउनमुळे समाजातील सर्वच घटकांवर परिणाम झाला आहे. कोरोनामुळे विविध मूलभूत गरजांपासून वंचित राहवे लागल्याने जगातील सुमारे १५ कोटीहून अधिक मुले गरिबीत ढकलले गेले आहेत. अशा मुलांची संख्या आता १.२ अब्जांवर पोचली आहे.
युनिसेफ आणि बाल हक्क संघटना ‘सेव्ह द चिल्ड्रन’चा अहवाल प्रसिद्ध झाला असून त्यानुसार गरिबीत राहणाऱ्या मुलांच्या संख्येत लक्षणीय भर पडल्याचे म्हटले आहे. अगोदरपासूनच मूलभूत गरजांपासून वंचित असणाऱ्या विशेषत: शिक्षण, आरोग्य, घर, पालनपोषण, साफसफाई, स्वच्छ पाणी यापासून दूर असणाऱ्या तसेच गरीबीत राहणाऱ्या मुलांची संख्या कोविडमुळे १५ टक्क्यांनी वाढली.
जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
युनिसेफने म्हटले की, हे सर्वेक्षण ७० देशांत केले असून त्यात शिक्षण, आरोग्य, निवास, आहार, स्वच्छता आणि पाणी या मुद्द्याचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे. कोरोनापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात या देशातील किमान ४५ टक्के मुले ही मूलभूत गरजांपैकी किमान एक गरजांपासून वंचित आहेत, असे दिसून आले. आगामी काळातही या देशातील मुलांची स्थिती अधिकच बिकट होऊ शकते. सध्याच्या काळात मोठ्या संख्येने मुले गरिबीचा सामना करत असून याशिवाय जी मुले अगोदरच गरिबीत जगत आहेत, ते अधिकच गरीब होत आहेत. युनिसेफच्या कार्यकारी संचालिका हेनरिटा फोरे यांच्या मते, कोविड-१९ ला रोखण्यासाठी जगभरात ठिकठिकाणी लॉकडाउन लागू करण्यात आले. त्यामुळे लाखो मुले आणखीच गरिबीच्या गर्तेत ढकलले गेले. सरकारकडून गरजूंना अन्नधान्यांचे वाटप होत असले तरी ती बाब पुरेशी नसल्याचे आढळून आले आहे. या संकटाची आता कोठे सुरवात असून ही बाब अधिक चिंताजनक आहे.
देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोरोना संसर्गामुळे इतिहासातील सर्वात मोठी जागतिक शैक्षणिक आणीबाणी निर्माण झाली आहे. गरीबी वाढल्याने मुलांना आणि त्यांच्या कुटुंबांना या स्थितीतून बाहेर येणे अधिकच कष्टदायक ठरु शकते. भविष्यात संख्या वाढू नये आणि मूलभूत गरजांपासून मुले वंचित राहणार नाहीत, यासाठी देशांना तातडीचे पावले उचलणे गरजेचे आहे.
इंगर एशिंग, सीईओ, सेव्ह द चिल्ड्रन
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
from News Story Feeds https://ift.tt/3mwVVCR
via IFTTT


No comments:
Post a Comment