लशीमुळे उमेदवार आजारी पडला नव्हता; ऑक्सफर्डचा खुलासा   - Maharashtra Mazaa

Latest

Wednesday, September 16, 2020

लशीमुळे उमेदवार आजारी पडला नव्हता; ऑक्सफर्डचा खुलासा  

https://ift.tt/eA8V8J

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकासमवेत ब्रिटीश ड्रगमेकर कंपनी लसनिर्मितीसाठी प्रयत्नशील आहे. भारतात सिरम इंस्टीट्यूटसमवेत ऑक्सफर्ड 'कोविशिल्ड' लशीची निर्मिती करत आहे. इंग्लंडमधील चाचणीदरम्यान एका उमेदवाराला काही गंभीर लक्षणे दिसून आल्यावर 6 सप्टेंबर रोजी ही चाचणी थांबवण्यात आली होती. 'ट्रान्सव्हर्स मायलिटिस' नावाचा दुर्मिळ असा पाठीचा विकार त्या उमेदवाराला दिसून आला होता. 
चाचणीसाठी लस दिलेल्या उमेदवारांवर काही अनपेक्षित परिणाम दिसून आल्यामुळे एस्ट्राझेनेका लसीची ट्रायल तातडीने थांबवण्यात आली होती. परंतु, हे अनपेक्षित परिणाम एस्ट्राझेनेका लसीचा परिपाक नसल्याचा निर्वाळा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने दिला आहे. 

याबाबत जाहीर केलेल्या अहवालात असं म्हटलं आहे की, उमेदवाराला हातापायात कमकुवतपणा आणि संवेदनांमधील बदल अशी काही लक्षणे दिसून आल्यावर ही चाचणी थांबवण्यात आली होती. आणि तातडीने सहभागी उमेदवारांच्या सुरक्षिततेचा आढावा घेतला होता. 

हे वाचा - वीस दिवसांत तीन वेळा गोळीबार;अरुणाचलमध्येही चीनच्या कुरापती

दरम्यान, आढावा घेतल्यानंतर संशोधकांच्या असे लक्षात की, आढळून आलेल्या या आजाराच्या लक्षणांचा आणि लशीचा काहीही संबध नाही. असा निर्वाळा जाहीर केलेल्या या अहवालात दिला आहे.  या लशीची चाचणी पुन्हा एकदा ब्रिटन, ब्राझील, भारत आणि साऊथ अफ्रिकामध्ये सुरु करण्यात आली आहे. मात्र युनायटेड स्टेट्समध्ये मात्र अद्यापही चाचणी थांबवलेलीच आहे.

दुसऱ्या टप्प्यात 100 हून अधिक लोकांना ऑक्सफर्डची लस देण्यात आली होती. मात्र भारतात सहभागी उमेदवारांना कसल्याही प्रकाराची अनपेक्षित लक्षणे दिसून आलेली नव्हती. तरीही, भारतातसुद्घा या चाचणीला स्थगिती देण्यात आली होता. एस्ट्राझेनेका ऑक्सफर्ड कोरोना व्हायरस वॅक्सिन AZD1222 ची मानवी चाचणी पुन्हा सुरु केली आहे, अशी माहिती मेडिसिन हेल्थ रेग्युलेटरी ऑथॉरिटी (MHRA) यांनी दिलेली आहे.



from News Story Feeds https://ift.tt/2RzCL0V
via IFTTT

No comments:

Post a Comment