नवी मुंबई: नवी मुंबईतील परिसरात एक विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. करोना झाला असून, कोविड सेंटरमध्ये दाखल होण्यासाठी जात आहे. कुटुंबाचं करोनापासून संरक्षण करायचं आहे असा बहाणा केला आणि गर्लफ्रेंडला घेऊन पसार झाला. पतीशी संपर्क न झाल्याने चिंतेत असलेल्या पत्नीने तो बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दिली. पोलिसांनी त्याला गर्लफ्रेंडसोबत इंदूरमध्ये पकडलं. तळोजा येथे राहणाऱ्या २८ वर्षीय तरुणाने २४ जुलै रोजी आपल्या पत्नीला फोन केला. मला करोना झाला आहे. मी खूपच त्रस्त आहे. मी आत्महत्या करण्यासाठी जात आहे, असे त्याने सांगितले. पत्नी रडू लागली. त्याला थांबवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याने तिचा फोन बंद केला. सहायक पोलीस आयुक्तांनी सांगितले की, त्या तरुणाने आपला फोन बंद ठेवला होता. दुसऱ्या दिवशी त्याच्या मेहुण्याला त्याची दुचाकी वाशीमध्ये सापडली. दुचाकीवर त्याचा हेल्मेट आणि ऑफिसची बॅग, पाकीट होतं. कुटुंबीयांनी वाशी पोलिसांत तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्या तरुणाचा शोध सुरू केला. वाशीजवळच्या नाल्यात त्याचा शोध घेतला. कोविड सेंटरमध्येही त्याला शोधलं. त्याचा मोबाइल सर्व्हिलान्सवर ठेवला. अखेर तो पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी त्याच्या मोबाइलमध्ये आधीचे सीमकार्ड बंद करून नवीन सीमकार्ड टाकलं. सर्व्हिलान्सच्या मदतीने तो इंदूरमध्ये असल्याचे कळले. पोलिसांचे एक पथक तिथे पोहोचले. त्यांनी त्या तरुणाला पकडले. इंदूरमध्ये तो नाव बदलून एका भाड्याच्या घरात गर्लफ्रेंडसोबत राहत होता.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iGYxvD
via IFTTT


No comments:
Post a Comment