व्हेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट पटकथेच्या पुरस्कारावर मराठमोळ्या 'चैतन्य'ने कोरले आपले नाव - Maharashtra Mazaa

Latest

Sunday, September 13, 2020

व्हेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट पटकथेच्या पुरस्कारावर मराठमोळ्या 'चैतन्य'ने कोरले आपले नाव

https://ift.tt/eA8V8J

मुंबई - दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेचा, शास्त्रीय संगीतावर आधारित असलेल्या ‘द डिसायपल’ या मराठी चित्रपटाने व्हेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट पटकथेच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. तसेच, मानाचा समजला जाणारा ‘फिप्रस्सी’ हा समीक्षकांचा पुरस्कारही त्याने पटकावला आहे. दोन मानाचे पुरस्कार या चित्रपटाने पटकावल्यामुळे या चित्रपटावर तसेच दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. चिनी- अमेरिकी चित्रपट निर्माते चोलोई झाओ यांच्या ‘नोमॅडलँड’ चित्रपटाला सर्वोच्च ‘गोल्डन लायन’ पुरस्कार मिळाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘द डिसायपल’ या चित्रपटाचा व्हेनिस चित्रपट महोत्सवात नुकताच प्रीमियर झाला होता. तिथे हा चित्रपट समीक्षकांच्या पसंतीस पडला. आता या वर्षीच्या व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमधील पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. ‘द डिसायपल’ने यामध्ये बाजी मारली आहे. फिप्रस्सी हा पुरस्कार मिळविणारा गेल्या तीस वर्षातील पहिला भारतीय चित्रपट आहे. याआधी १९९० मध्ये अदूर गोपाळकृष्णन दिग्दर्शित ‘माथिलुकल’ या चित्रपटाने फिप्रस्सी हा पुरस्कार मिळवला होता. कोणताही भारतीय चित्रपट व्हेनिस चित्रपट महोत्सवासाठी जाण्याची ही गेल्या सुमारे २० वर्षातील पहिलीच वेळ आहे. याआधी मीरा नायर यांचा ‘मॉन्सून वेडिंग’ हा चित्रट २००१मध्ये महोत्सवासाठी निवडला गेला होता. त्या चित्रपटाने ‘गोल्डन लायन’ पुरस्कारही मिळविला होता. 

पुण्यातील पावसाचा राज्यात सातवा क्रमांक;सर्वाधिक पाऊस नगर जिल्ह्यात

द इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटिक्स (एफआयपीआरईएससीआय, फेडरेशन इंटरनेशनल डे ला प्रेस सिनेटॅटोग्राफीक फॉर शॉर्ट) या संस्थेने सादर केलेला हा पुरस्कार चित्रपट संस्कृतीचा प्रसार आणि विकास तसेच व्यावसायिक हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी आहे.

महाराष्ट्राची बदनामी सहन करणार नाही; मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील प्रमुख 10 मुद्दे

या चित्रपटाचे निर्माते विवेक गोम्बर म्हणाले की, ‘व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये आमच्या चित्रपटाचा गौरव झाला ही आनंदाची बाब आहे. गेल्या काही वर्षांमध्ये फिप्रस्सीने आमच्यावर ठेवलेल्या विश्वासामुळे आम्हाला आणखी प्रोत्साहन मिळालेले आहे.’’ आदित्य मोडक यांनी या चित्रपटात भारतीय शास्त्रीय गायकाची प्रमुख भूमिका साकारली आहे. ऑस्कर विजेते चित्रपट निर्माते अल्फोन्सो कुरोन हे ‘द डिसायपल’ चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.

‘माझ्या कामाचे कौतुक केल्याबद्दल मी ज्युरीच्या सर्व सदस्यांचे मनापासून आभार मानतो. ‘द डिसायपल’च्या प्रवासाची ही विलक्षण सुरुवात पाहून आम्हा सर्वांना खूपच आनंद झाला असून, आम्ही सर्व या चित्रपटाच्या पुढील प्रवासासाठी खूप उत्सुक आहोत.
- चैतन्य ताम्हाणे, दिग्दर्शक

Edited By - Prashant Patil



from News Story Feeds https://ift.tt/3iziWD2
via IFTTT

No comments:

Post a Comment