नवी दिल्ली - कोरोनावर मात करून घरी परतलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रकृती शनिवारी रात्री अचानक बिघडल्यानं उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आलं. श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अमित शहांची गेल्या महिन्यात दोन ऑगस्टला कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. तेव्हा त्यांच्यावर गुरुग्राम इथल्या मेदांता रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.
मेदांता रुग्णालयात उपचारानंतर त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. तेव्हा ठणठणीत बरे झाल्यानंतर 14 ऑगस्टला रुग्णालयातून सोडण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर पुन्हा चारच दिवसांनी 18 ऑगस्टला अशक्तपणामुळे एम्समध्ये दाखल केलं होतं. जवळपास दोन आठवडे ते एम्समध्येच होते. 31 ऑगस्टला अमित शहा यांना एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला होता. आता पुन्हा शनिवारी त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्यानं रुग्णालयात दाखल केलं आहे.
from News Story Feeds https://ift.tt/2Rpjmj2
via IFTTT


No comments:
Post a Comment