मोठं पाऊल उचलावं लागलं तर मागे हटणार नाही; राजनाथ सिंहांचा चीनला इशारा - Maharashtra Mazaa

Latest

Thursday, September 17, 2020

मोठं पाऊल उचलावं लागलं तर मागे हटणार नाही; राजनाथ सिंहांचा चीनला इशारा

https://ift.tt/eA8V8J

नवी दिल्ली- भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या मुद्द्यावर संसदेत भाष्य केलं. भारत चीन वाद अजून सुटलेला नाही. दोन्ही देशांचा वेगवेगळा दावा असल्याने ही स्थिती गंभीर बनली आहे. चीनने सध्याची सीमा मान्य करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे चीनच्या कुरापती सुरु आहेत. मात्र, चिनी सैन्याच्या कोणत्याही कारवाईला सडेतोड उत्तर देण्यास भारतीय सैन्य तयार आहे, असं ते म्हणाले आहेत. 

कोरोना लस कधी येणार? आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी राज्यसभेत दिली माहिती

पाकव्याप्त काश्मीरची जमीन मोठ्या प्रमाणावर चीनला देण्यात आली आहे. मे महिन्यात चीनकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर १५ जून रोजी लडाख प्रांतात चीन आणि भारताच्या सैनिकांमध्ये झडप झाली. यात भारताच्या २० जवानांना विरमरण आलं. मात्र, भारतीय लष्कराने चिनी सैनिकांना  सडेतोड उत्तर दिलं. चीनला कुरापती करू नये असा इशारा देण्यात आला.  दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता निर्माण करण्यावर सहमती दर्शवली आहे, असंही सिंह म्हणाले. 

जिथं संयम हवा होता तिथं संयम ठेवला आणि जिथं शौर्य दाखवायचं होतं तिथं शौर्य दाखवलं आहे. आपले जवान सीमेवर देशाला सुरक्षित ठेवण्याचं कर्तव्य पार पाडत आहेत. त्यावर कोणी शंका उपस्थित करू नये. शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवताना संवेदनशीलता ठेवणंही आवश्यक आहे. चीनसोबत सातत्याने चर्चा केली जात आहे. 
दोन्ही देशांनी एलएसीवर प्रोटोकॉलचं पालन करावं. सर्व करार आणि सामंजस्याचं पालन दोन्ही देशांनी करायला हवं, असं संरक्षणमंत्री म्हणाले.  

आंतराराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती घसरल्या; भारतातही स्वस्त होऊ शकतं सोनं

चीनच्या कुरापती पाहता त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक दिसतो. चीनकडून सैनिक तैनात केलं जाणं हे कराराचं उल्लंघन आहे. आपले लष्कर चीनला चोख प्रत्युत्तर देईल. कोरोनाच्या संकट काळात लष्कर आणि आयटीबीपीच्या जवानांना तैनात करण्यात आलं. अशा परिस्थितीत त्यांचे काम उल्लेखनीय असं आहे. सीमेवर अनेक रस्ते आणि पूल उभारले. यामुळे स्थानिकांसह लष्करालासुद्धा मोठी मदत झाली.गरज पडल्यास आपले सैनिक चीनला चोख प्रत्युत्तर देऊ शकतात. कितीही मोठं पाऊल उचलावं लागलं तरी चालेल आम्ही मागे हटणार नाही. भारत हा वाद शांततेनं आणि चर्चेनं सोडवण्यासाठी नेहमीच तयार आहे. चीनने आम्हाला साथ द्यावी असंही चर्चेवेळी सांगितलं होतं. कराराची अंमलबजावणी केल्यास शांतता प्रस्थापित करता येईल.  देशाची मान खाली येऊ देणार नाही . लडाखमध्ये आव्हान आहे हे सत्य आहे, मात्र आपले लष्कर याचा सामना करण्यासाठी समर्थ आहे, असं राजनाथ सिंह यांनी संसदेत बोलताना म्हटलं. 



from News Story Feeds https://ift.tt/3mx8Mow
via IFTTT

No comments:

Post a Comment