पुणे - आर्थिक ऐपत वाढविण्यासाठी महापालिकेतील जुन्या-नव्या सत्ताधाऱ्यांनी उपायांची जंत्री आखूनही उपयोग न झाल्याने आता "दात कोरून पोट' भरण्याचा उद्योग चालविला आहे. आपल्या मालकीची 1400 घरे विकून कारभार चालविण्याचा निर्णय घेतला असून, ही घरे विकल्यानंतर एकरकमी 125 कोटी रुपये मिळण्याची आशा महापालिकेला आहे. पण, अशा प्रकारे तिजोरी भरून किती दिवस काढायचे, असा प्रश्न पुढे आला आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
महापालिकेच्या मालकीची घरे विकण्याचा प्रस्ताव सत्ताधारी-अधिकाऱ्यांपुढे आला; त्यातही ती कोणत्या भागात आणि कोणाला विकायची ?, यावरून मतभेद असल्याचे लपून राहिले नाही. त्यामुळे ही घरे खरोखरच गरजूंना विकली जाणार; की एखाद्या बांधकाम व्यावसायिकाच्या घशात जाणार, याची चर्चा महापालिकेत रंगली आहे.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोरोनाच्या साथीने महापालिकेचे उत्पन्न प्रचंड घसरले आहे. त्यातच जेमतेम 144 कोटी रुपये शिल्लक राहिले आहेत. परिणामी, आगामी काळात पुणेकरांच्या मूळ गरजा, महसुली खर्च आणि कोरोनावर उपाय करताना अडचणी येणार असल्याचे दिसत आहे. कोरोनाने अपेक्षित उत्पन्न मिळाले नसल्याचे सत्ताधारी-अधिकारी सांगत असले तरी, यापूर्वी उत्पन्नवाढीच्या प्रयत्नांचा परिणाम झाल्याचे दिसत नाही. याआधी उत्पन्नांचे नवे स्रोत शोधून त्यावर बैठका, घोषणा, आदेश आणि अंमलबजावणीस प्रारंभ झाला; मात्र, त्यातून नव्या पैशांचेही उत्पन्न मिळाले नाही. त्यासाठी महसूल समितीही नेमली. पण कार्यवाही कुठे झाली नसल्याने महापालिकेने आता मिळकती विकण्याचाच निर्णय घेतला आहे. गेल्या 10 वर्षांत उत्पन्न वाढीवर हालचाली झाल्या नाहीत, असा आरोप स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांनी केला आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
भाडेकरूंनाच विकणार घर
पुणे शहरातील विविध प्रकल्पांतर्गत महापालिकेच्या ताब्यात असलेल्या सदनिका विकण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या योजनेतील सर्व घरे 270 चौरस फुटांची आहेत. ती गरजूंना सध्या किमान पैशांत भाडेतत्त्वावर दिली आहेत. त्यामुळे याच लोकांना घरे विकण्याचा विचार महापालिका करीत आहे. त्यासाठी संबंधितांकडून बाजारमूल्य दर (रेडिरेकनर), बांधकामाचा खर्च घेऊन घरे विकण्याच्या पर्यायांवर महापालिका विचार करीत आहे.
नगरसेवकांचे जागांसाठी प्रयत्न?
घरांपाठोपाठ सुविधा क्षेत्र म्हणजे ऍमिनिटीज स्पेसही विकण्याचा महापालिकेचा विचार आहे. त्यासाठी 118 क्षेत्र निश्चित केले आहेत. हे क्षेत्र विकण्याच्या प्रक्रियेत मात्र राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे दिसून येत आहे. त्याचवेळी कवडीमोल भावात या जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवकांनी आपली यंत्रणा कामाला लावली आहे. ठराविक भागांतील सुविधा क्षेत्र आपल्याच पदरात पाडून घेण्यासाठी नगरसेवक प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
घरे (प्रकल्पातर्गंत ताब्यातील घरे)
2 हजार 800 - एकूण घरे
----------------------
1 हजार 400 - विकी करायची घरे
----------------------
270 चौरस फूट - घरांचा आकार
--------------------
महापालिकेच्या ताब्यातील घरे ही सध्याच्या रहिवाशांना विकण्याचा निर्णय घेणार आहोत. मात्र, या घरांच्या किंमत अद्याप ठरलेल्या नाहीत. गरजू लोकांना सहजरीत्या घर विकत घेता येऊ शकेल, अशा पर्यायांना प्राधान्य देणार आहे.
- राजेंद्र मुठे, प्रमुख, मालमत्ता व व्यवस्थापन विभाग, महापालिका
from News Story Feeds https://ift.tt/3msoS2Q
via IFTTT


No comments:
Post a Comment