नाशिक : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी एका सैनिकास भेट दिली इतकेच नव्हे तर प्रसिध्द सिनेतारका कंगना राणावत हिचे मुंबईतील कार्यालय पालिकेने तोडल्याच्या तक्रारीवर तिलाही भेट दिली. इथे कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाने तर राज्यात लाखो शेतकऱ्यांची घरे उध्वस्थ झाली आहेत , या शेतकऱ्यांसाठी केंद्राकडे राज्यपाल मध्यस्थी करून आम्हाला ते नक्कीच भेट देतील. असे शेतकरी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष हंसराज वडघुले यांनी सांगितले. तसेच कांदाप्रश्नी राज्यपालांच्या भेटीची मागणी केली आहे. हंसराज वडघुले यांनी या संदर्भात निवेदन आणि सोशल मीडियातील एका व्हीडिओव्दारे आवाहन केले आहे.
जशी सिनेतारकेस त्यांनी भेट दिली तशीच आम्हालाही भेट देतील
अन्यायाची भावना असलेले अनेक लोक राज्यपाल महोदयांची भेट घेतात. राज्यपाल देखील संवेदनशील मनाचे आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना भेटी देऊन त्यांनी त्यांच्या अन्याय निवार्णार्थ प्रयत्नही केले आहेत. नुकतीच एका माजी सैनिकास भेट देऊन त्यांची विचारपूस केली. एका प्रसिध्द सिनेतारकाचे मुंबईतील कार्यालय महापालिकेने घर तोडले असल्याची तक्रार त्यांच्यापर्यंत पोहचताच त्यांनी या तारकेसही भेट दिली. या तुलनेत कांदा निर्यातबंदीच्या केंद्र सरकारच्या निर्णयाने राज्यातील लाखो शेतकऱ्यांची घरे उध्वस्थ झाली आहे. एक प्रकारे केंद्र सरकारने घरावर दरोडा घातल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. आमची समस्या रास्त असल्याने राज्यपालांनी केंद्राकडे आमचा मुद्दा नक्कीच नेतील व जशी सिनेतारकेस त्यांनी भेट दिली तशीच ते आमच्या शेतकरी शिष्टमंडळासही देतील, याबाबत खात्री असल्याचे वडघुले यांनी म्हटले.
हेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ
शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला
१४ सप्टेंबरला अचानक केंद्राने कांदा निर्यातबंदीची भूमिका घेतली. या संदर्भात शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना देण्यात आली नाही. सरकारने स्वत:च बनविलेल्या नियमनमुक्तीच्या कायद्यास फाटा कांद निर्यातबंदीच्या निर्णयाने फाटा देत शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. १४ सप्टेबरला केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला. हा निर्णय केंद्र शासनाने यापूर्वी जाहीर केलेल्या शेतीशी संबंधीत धोरण व घोषणेच्या अगदी विपरीत आहे. शेतमाल विनियमन अधिनियमाच्या अगजीच विपरीत आहे. त्यामुळे राज्यातील कांदा दर पडले. निर्यातीसाठी बंदरे व अन्य केंद्रात पॅक केलेला कांदा थांबविण्यात आला. बांगलादेशसह अन्य देशांच्या सीमेवर हजारो ट्रक उभे आहेत. त्याने शेतकरी अतिशय दुःखी आहे. कष्टी आहे. त्याच्या या वेदना राज्यपालांपर्यंत पोहोचविण्यात यश येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान वडघुले यांना राज्यपालांनी अद्याप भेटीची परवानगी दिलेली नाही. त्यासाठी त्यांनी विनंती पत्र पाटविले आहे. तसेच हे शिष्टमंडळ भेटीसाठी राजभवनाशी संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO
from News Story Feeds https://ift.tt/2H2mPSP
via IFTTT


No comments:
Post a Comment