नवी दिल्ली : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून मागील 24 तासांत देशात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. शुक्रवारी सकाळी 8 वाजल्यापासून ते शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात 97,570 नवे रुग्ण सापडले आहेत. एका दिवसांत आतापर्यंतची ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. भारतासहीत जगभरातील 180 हून अधिक देशांना कोरोना विषाणूचा मोठा फटका बसला आहे. आतापर्यंत जगात 2.81 कोटींहून अधिक लोकांना कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. या विषाणूमुळे आतापर्यंत 9.09 लाखांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत.
लष्करात जवान आणि अधिकाऱ्यांच्या जेवणात दुजाभाव का? राहुल गांधींचा सवाल
भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढतच आहे. आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाबाधितांची संख्या ही 46 लाख 59 हजार 984 वर पोहोचली आहे. काल दिवसभरात 1 हजार 201 रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. आतापर्यंत 36 लाख 24 हजार 196 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशभरात एकूण 77 हजार 472 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या साऱ्या परिस्थितीत सकारात्मक बाब अशी की, गेल्या 24 तासांत सर्वाधिक म्हणजेच 81, 533 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशात 9 लाख 58 हजार 396 इतके लोकांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांचा रिकव्हरी रेट हा 77.77 वर गेला आहे. मागील रिकव्हरी रेटचा विचार करता त्यात फारसा फरक पडलेला नाहीय.
''CM उद्धव ठाकरेंसह शिवसैनिकांना अयोध्येत विरोधाचा सामना करावा लागेल"
11 सप्टेंबर रोजी 10 लाख 91 हजार 251 कोरोना सँपल टेस्ट करण्यात आल्या होत्या. आतापर्यंत देशात 5 कोटी 51लाख 89 हजार 226 सँपल टेस्ट झाल्या आहेत. देशातील जवळपास सर्वच राज्यात हे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. सध्याची परिस्थिती पाहता कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक क्षेत्रांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. देशातील बेरोजगारीचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे चित्र आहे. देशाच्या अर्थव्यवस्था ही कोरोना प्रादुर्भावाच्या आधीपासूनच उतरत्या दिशेला लागली होती. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाल्याचे चित्र आहे.
from News Story Feeds https://ift.tt/32kXQSW
via IFTTT


No comments:
Post a Comment