|
अकोला : राजराजेश्वर मंदिरा मागे शिवाजी नगर येथे गोसावी यांचे राहणे आहे. येथे ५०० वर्ष जुना मठ आहे. हिंदू धर्म, गोसावी समाजाचा प्रचार प्रसार याच मठाद्वारे पुरातन काळापासून सुरू होते. या मठात पुरातन श्री गणेशाची शेषनागारवर विराजित विलोभनीय मातीची मूर्ती स्थापित आहे. ही मूर्ती ५०० वर्ष पुरातन असल्याचाही दावा केला जातो. या मठाचा वारसा गोसावी कुटुंबातील तेरावी पिढी चालवत असून, त्यापूर्वीपासून गणेशाची पूजा नित्यनियमाने सुरू आहे. अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा मात्र १६ व्या शतकात गोसावी संस्कृतीचा प्रचार व प्रसार करणाऱ्या सन्यस्त अनुयायंचा मठ होता. या घरामधे श्री उदयपूरी महाराज यांची समाधी आहे. त्यावर सुद्धा पुरातन अशी शिवलिंग आहे व घराबाजूला श्री राम पूरी महाराज यांचे समाधी मंदिर सुद्धा आहे. कालांतराने हा सन्यस्थ मठ गृहास्थमाकडे वळला व वशपरंपरा सुरू झाली. सद्यस्थितीत तेरावी पीढी या घरात वास्तव्याला आहे. त्यापूर्वीपासून या मठातील गणेश मंदिरात पूजा सुरू आहे. वारसा पंरपरेनुसार मिळालेल्या माहितीनुसार सध्या तेराव्या पिढीपर्यंतची माहिती उपलब्ध आहे. त्यापूर्वी येथे गोसावी कुटुंबाचे वास्तव्य होते, असा दावा केला जातो. मात्र, त्याचे लिखित स्वरूपात कोणतेही पुरावे नाहीत. गोसाव्याच्या ओट्यावर गजानन महाराजांनी घेतला होता विसावा मंदिर कधी बांधले व मूर्ती कोणी स्थापन केली याचा अंदाज नाही. पण, ५०० वर्षांपूर्वीची हे मंदिर असावे. पूरातन इतिहास हा वंशपरंपरेनुसार सुरू आहे. तो आजच्या पिढीपर्यंत पोहोचावा, जेनेकरून हिन्दू सांस्कृती व आपले पूर्वज व त्यांचे कार्य आजच्या पिढीला कळवे हाच एक उद्देश्य. |
|||
from News Story Feeds https://ift.tt/34wKzbp
via IFTTT


No comments:
Post a Comment