नवी दिल्ली- काँग्रेसमध्ये Congress नेतृत्व बदलाच्या मुद्द्यावरुन कार्यकारिणीची बैठक CWC सुरु आहे. बैठकीत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्राच्या टायमिंगवर शंका घेतली आहे. सोनिया गांधी (Sonia Gandhi) आजारी असताना त्यांना पत्र पाठवण्यात आले. काँग्रेस मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये राजकीय संकटाचा सामना करत होती, पक्षाच्या अध्यक्षा आजारी होत्या, तेव्हाच पत्र का लिहिण्यात आले, असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला आहे.
कोण म्हणतं काँग्रेस फक्त गांधी घराण्याचा पक्ष? 19 पैकी 14 अध्यक्ष इतर
राहुल गांधी यांनी पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान पत्र लिहिण्याच्या वेळेमागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला आहे. भाजपसोबत लागेबांधे असल्याने पक्ष संकटाच्या स्थितीत असताना पत्र लिहिण्यात आले, अशी शंका राहुल यांनी घेतली आहे.
काँग्रेसच्या २० पेक्षा अधिक वरिष्ठ नेत्यांनी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहित नेतृत्व बदलाची मागणी केली आहे. पक्षाला पूर्णवेळ आणि सक्रीय असा अध्यक्ष असावा. तसेच पक्षात वरपासून खालीपर्यंत बदल करण्याची मागणी पत्रात करण्यात आली आहे. पत्रात गांधी कुटुंबीयांवर थेट टिका करण्यात आली नाही. मात्र, लवकरात लवकर अध्यक्ष निवडण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक पदासाठी निष्पक्ष निवडणुका घेण्याची मागणी काँग्रेस नेत्यांनी केली आहे.
सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे. शिवाय पक्षाला अध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार निवडण्यास सांगितलं आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग सोनिया गांधीच्या समर्थनात पुढे आले आहे. त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पत्र लिहिणे दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. पक्षाच्या हाय कमांडला दुर्बेल करणे, पक्षाला दुर्बेल करण्यासारखे असल्याचं ते म्हणाले आहेत.
कपिल सिब्बल यांच्या एका ट्विटने काँग्रेसमध्ये खळबळ
कपील सिब्बल, शशी थरुर, गुलाम नबी आझाद, पृथ्वीराज चव्हाण, विवेद टांका, आनंद शर्मा यांसारख्या वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहित तात्काळ नेतृत्व बदलाची मागणी केली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये पेपर बॉम्ब फुटला आहे. दुसरीकडे राहुल गांधी यांचा समर्थक गट पुढे आला असून त्यांनी अध्यक्षपद सांभाळावे अशी विनंती केली आहे. मात्र, राहुल गांधी यांनी पुन्हा अध्यक्ष होण्याची कोणतीही इच्छा बैठकीत दाखवली नाही.
(edited by-kartik pujari)
from News Story Feeds https://ift.tt/3j7y7TB
via IFTTT


No comments:
Post a Comment