अकोला : काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येणाऱ्या मांडूळ जातीचा साप घेऊन जाणाऱ्या दोघांना पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने सोमवारी (ता.२४) रंगेहात पकडले.
याआधीही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. या व्यक्तींचं नाव विकास श्रीराम सावळे (वय २१) व कृष्णा गणेश गुर्जर (वय २६) या दोघांना अटक केली. त्याच्याकडून एक दुतोंडा म्हणजेच मांडूळ साप ताब्यात घेतला. मंद हालचाल,जाडसर शरीर, शेपटी व तोंडात जवळपास साम्य वाटत असल्याने याला दुतोंड्या असे नाव आहे.
अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा
पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख पोलिस निरीक्षक मिलिंदकुमार बहाकार यांना गोपनीय माहिती मिळाली की, पारस येथून दोघेजण दुचाकीने अकोल्यात मांडूळ जातीचा साप घेऊन येत आहेत. पोलिसांनी सापळा लावून त्यांना पकडले.

शाळा बंद तरी स्कूल बॅगमध्ये ठेवला साप
ची चौकशी केली असता त्यांच्याकडे असलेल्या एका स्कूल बॅगमध्ये दुर्मीळ मांडूळ जातीचा साप दिसून आला. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी विक्री करिता घेऊन जात असल्याचे कबूल केले. पोलिसांनी या प्रकरणी पारस येथील एमईसीबी कॉलनीत रहिवासी असलेल्या विकास श्रीराम सावळे (वय २१) व कृष्णा गणेश गुर्जर (वय २६) या दोघांना अटक केली. त्यांची दुचाकीही जप्त करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सापाची किंमत ऐकून व्हाल अवाक
पोलिसांना आधीच या सापाची विक्री केली जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. या सापाची मार्केटमधील किंमत जवळपास ३ कोटी रूपयांपेक्षा अधिक सांगतिले जाते. त्यामुळे अर्थातच या सापाला एवढी किंमत का असा प्रश्न लोकांना पडतो.

कशासाठी होतो वापर
मांडूळ या सापाचा वापर सेक्स पॉवर वाढवण्यासाठी, नशेचे पदार्थ तयार करण्यासाठी, महागडे परफ्यूम तयार करण्यासाठी आणि कॅन्सरच्या उपचारासाठी विदेशात केला जातो. चला जाणून घेऊ या सापाविषयी आणखी काही खास गोष्टी....

कुठे राहतो हा साप?
हा साप जास्त करून वाळूमध्ये राहतो. अॅनाकोंडाप्रमाणे या सापाचे डोळे डोक्यावर असतात. शिकारीसाठी हा साप वाळूमध्ये स्वत:ला लपवतो आणि केवळ त्याचं डोकं वर राहतं. शिकार जवळ येताच त्यावर हल्ला करतो. परदेशात अनेकजण हा साप पाळतात सुद्धा. सापांच्या सर्व प्रजातींमधील जमिनीवरील सर्पांतील लाजाळू व शांत स्वभावाचा हा साप आहे.

प्रजननाचं माध्यम
मांडूळ सापांमध्ये प्रजनन मादा द्वारे अंडी देऊन होतं. जन्मावेळी सापाची लांबी आठ ते दहा इंच इतकी असते. त्यांचा प्रजननाचा काळ हा पानझळ किंवा थंडीच्या दिवसात असतो.

कुठे आढळतात हे साप?
या सापाच्या वेगवेगळ्या प्रजाती वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आढळून येतात. एक प्रजाती उत्तर अमेरिकेतील मुख्य रूपाने प्रशांत महासागराच्या तटावर आढळून येते. एक प्रजाती यूरोप, उत्तर आफ्रिका आणि आशियाच्या काही भागांमध्ये आढळते. तर भारतात आणि आफ्रिकेतही एक प्रजाती आढळते.

काय खातात आणि कशी करतात शिकार?
इतर सापांप्रमाणेच हा साप देखील मांसाहारीच आहे. या सापांच्या राहण्याच्या ठिकाणाच्या आधारावर शिकार वेगवेगळे असतात. तसे हे साप जास्त करून उंदीर, पाल, बेडूक, ससे इत्यादी शिकार करतात. वाळूच्या खाली लपून हा साप शिकारीची वाट बघतो. शिकार जवळ आल्यावर आपल्या धारदार दातांनी त्यावर हल्ला करतो. तसेच शिकार बेशुद्ध होईपर्यंत त्यांचं रक्त पित राहतो.
from News Story Feeds https://ift.tt/3gxGOF0
via IFTTT


No comments:
Post a Comment