नवी दिल्ली- ज्येष्ठ वकील आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याविरोधात सुनावणी सुरु आहे. महाधिवक्ता केके वेणूगोपाल यांनी भूषण यांना चेतावणी देऊन सोडण्यात यावं, त्यांना शिक्षा दिली जाऊ नये असं न्यायालयात म्हटलं. यावर बोलताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की, प्रशांत भूषण यांनी आपल्या टिप्पणीच्या उत्तरात जे वक्तव्य केलं ते जास्त अपमानकारक आहे.
प्रशांत भूषण प्रकरणी सुनावणीला न्यायाधीशांनी दर्शवली असमर्थता
प्रशांत भूषण यांनी 2009 मध्ये दिलेल्या आपल्या वक्तव्याबाबत खेद व्यक्त केला होता, पण बिनशर्त माफी मागण्यास नकार दिला होता. माझं त्यावेळच्या वक्तव्याचा अर्थ भ्रष्टाचार असा नव्हता, तर योग्य प्रकारे कर्तव्य न निभावण्याबाबत होते. 2009 मध्ये एका मुलाखतीत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या 8 न्यायमूर्तींना भ्रष्ट म्हटलं होतं.
सुनावणीवेळी महाधिवक्ता म्हणाले की, न्यायपालिकेतील भ्रष्टाचाराविषयी अनेक न्यायमू्तींनी यापूर्वी वक्तव्य केली आहेत. त्यामुळे भूषण यांना चेतावणी देऊन सोडण्यात यावे. न्यायपालिकेच्या सुधारण्यासाठी अशी वक्तव्य केली जातात. त्यामुळे त्यांना पुन्हा असं वक्तव्य न करण्याची चेतावणी देऊन सोडून द्यायला हवं.
आदित्य ठाकरेंनी लिहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र; काय आहे पत्रात
ज्येष्ठ वकील आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांच्याविरोधातील 2009 मध्ये न्यायालयाच्या अवमान प्रकरणाची सुनावणी 10 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यावेळीसुद्धा त्यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याविरोधात खटला चालवला होता. या प्रकरणाची सुनावणी 10 सप्टेंबरला होणार आहे. दरम्यान, ट्वीटरवरून अवमान केल्याच्या दुसऱ्या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे.
प्रशांत भूषण यांच्याविरोधातील 2009 अवमान प्रकरणाच्या याचिकेवर सुनावणीसाठी न्यायाधीश अरुण मिश्रा यांनी असमर्थता दर्शवली आहे. योग्य अशा घटनापीठाकडे हे प्रकरण सोपवावे अशी विनंती त्यांनी सरन्यायाधीशांकडे केली. अरुण मिश्रा म्हणाले की, मी लवकरच निवृत्त होणार आहे. त्यामुळे कमी काळात यावर सुनावणी करणं शक्य नसल्याचंही न्यायाधीशांनी म्हटलं.
दरम्यान, प्रशांत भूषण यांनी वादग्रस्त ट्विटबद्दल सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागण्यास नकार दिला. त्यांनी अवमान प्रकरणी आपली बाजू पुन्हा मांडली होती. मात्र, त्याआधीच सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता आणि सुनावणीची औपचारिकता बाकी होती. त्याआधी प्रशांत भूषण यांना सोमवारपर्यंत बिनशर्त माफी मागण्याची संधी दिली होती.
सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या उत्तरात प्रशांत भूषण यांनी म्हटलं होतं की, 'माझे ट्वीट सद्भावनापूर्वक होते आणि त्यावर मी ठाम राहणार आहे. मी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर न्याायलयाला उत्तरे देता आली नाहीत. माझं मत आहे की, जर मी माफी मागितली, तर तो माझ्या स्वाभिमानाचा अवमान होईल, आणि ज्या व्यवस्थेचा मी आदर करतो तिचाही अपमान होईल.'
from News Story Feeds https://ift.tt/2QlHsuy
via IFTTT


No comments:
Post a Comment