कोल्हापूर: शिवसेनेचे कोल्हापूरचे खासदार प्राध्यापक यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलाचाही करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील तीन आमदारांच्या पाठोपाठ खासदारही बाधित झाल्यामुळे चिंता वाढली आहे. ( tests coronapositive) करोना साथीच्या सुरुवातीच्या टप्प्यात तुलनेनं सर्वात कमी प्रभावित असलेला जिल्हा म्हणून कोल्हापूरचे नाव होते. मात्र नंतरच्या काळात जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत गेली. आता लोकप्रतिनिधींनाही करोनाने विळखा घातला आहे. यापूर्वी आमदार प्रकाश आवाडे, ऋतुराज पाटील व चंद्रकांत जाधव यांना करोनाची लागण झाली आहे. या तिघांवरही सध्या उपचार सुरू आहेत. त्यातच आता मंडलिक यांना करोनानं गाठलं आहे. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. वाचा: कोविड १९ ची साथ आणि त्यानंतर घेण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात लोकप्रतिनिधी विविध कामांनिमित्तानं मतदारसंघामध्ये फिरत आहेत. बैठका व अन्य जबाबदाऱ्यांमुळं त्यांचा अधिकारी व पोलिसांशी संपर्क येत आहे. त्यातून त्यांना करोनाची लागण होण्याचं प्रमाण वाढलं आहे. आतापर्यंत राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांनाही करोनाची लागण झाली आहे. त्याता साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, अस्लम शेख यांचा समावेश आहे. या सर्वांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gprhXR
via IFTTT


No comments:
Post a Comment