नवी दिल्ली- काँग्रेसने स्वातंत्र्यापासून आतापर्यंत एकूण १९ नेत्यांना अध्यक्षपदावर बसवलं आहे. यात नेहरु-गांधी घराण्यातील पाच नेते आहेत. २०१७ मध्ये जेव्हा राहुल गांधी यांना काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती, तेव्हा ते पाचवे असे व्यक्ती ठरले होते. सध्या पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नावावर सर्वाधिक काळ अध्यक्ष राहण्याचा विक्रम आहे. सोनिया १९ वर्षांपर्यंत काँग्रेसच्या अध्यक्षा राहिल्या आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडलं होतं. त्यावेळी सोनिया गांधी यांना हंगामी अध्यक्षा करण्यात आलं होतं. काँग्रेसमध्ये नेहरु-गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष जास्त काळ पदावर राहू शकला नाही.
आतापर्यंत कोणत्या नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे, ते आपण पाहुया..
ज्योतिरादित्यांचा भाजप प्रवेश 'सही या गलत'? फैसला मायावतींच्या हाती
१) ज्यावेळी भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळी आचार्य कृपलानी काँग्रेसचे अध्यक्ष होते. प्रधानमंत्री पदासाठीच्या मतदानात सरदार वल्लभभाई पटेल यांच्यानंतर सर्वाधिक मते कृपलानी यांना पडले होते. मात्र, महात्मा गांधी यांच्या सांगण्याने दोन्ही नेत्यांनी आपले नाव माघारी घेतले होते.
![]()
२) पट्टाभी सीतारमय्या पक्के गांधीवादी होते. १९४८ च्या अधिवेशनात त्यांना काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं. १९५० पर्यंत ते पक्षाचे अध्यक्ष होते.
३) पुरुषोत्तम दास टंडन यांनी १९५० मध्ये आचार्य कृपलानी यांना हरवून काँग्रेसचे अध्यक्षपद मिळवले. १९५१ मध्ये त्यांनी पदाचा राजीनामा दिला, १९५२ साली त्यांनी अलाहाबादमधून लोकसभा निवडणूक जिंकली. पुढील वर्षी त्यांना राज्यपाल बनवण्यात आलं.
४) जवाहरलाल नेहरु यांनी प्रधानमंत्री असताना पाच वर्षांपर्यंत काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. स्वातंत्र्यानंतर नेहरु-गांधी घराण्यातील ते पहिले अध्यक्ष होते.
![]()
५) उच्छंगराय नवलशंकर ढेबर काँग्रेसचे पाचवे अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांनी राजकोट लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले होते.
६) वडिलांप्रमाणे इंदिरा गांधी प्रधानमंत्री असताना जवळजवळ ५ वर्षे काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या. त्या १९५९ मध्ये पहिल्यांदा अध्यक्ष बनल्या होत्या. त्यानंतर आणीबाणीमध्ये १९७८ साली त्या दुसऱ्यांदा अध्यक्षा झाल्या.
![]()
७) पुढे चालून राष्ट्रपती बनणारे नीलम संजीव रेड्डी १९६० ते १९६४ दरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यानंतर लाल बहादूर शास्त्री यांच्या सरकारमध्ये त्यांना मंत्री करण्यात आलं होतं. त्यांचा इंदिरा गांधींच्या कॅबिनेटमध्येही समावेश होता.
८) स्वातंत्र्यानंतर प्रमुख गैर गांधी अध्यक्ष राहिलेले कामराज यांना १९६० च्या दशकातील 'किंगमेकर' म्हणून ओळखलं जातं. ते दोन वेळा काँग्रेसचे अध्यक्ष होते. १९६४ ते १९६७ दरम्यान अध्यक्ष असताना त्यांनी शास्त्री आणि इंदिरा गांधी यांना पंतप्रधान होताना पाहिलं.
![]()
काँग्रेस अध्यक्ष कोण? सोनिया गांधींनी राजीनामा दिल्यास महाराष्ट्रातील नेत्यासह...
९) एस निजलिंगप्पा काँग्रेसचे नववे अध्यक्ष होते. १९६८ ते १९६९ दरम्यान जेव्हा काँग्रेस १९६७ च्या निवडणुकीतील पराभव पचवत होती तेव्हा ते अध्यक्ष होते. १९६९ मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली. निजलिंगप्पा अविभाजित काँग्रेसचे शेवटचे अध्यक्ष होते.
१०) पी. मेहुल १९६९ ते १९७० दरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष होते.
११) बाबू जगजीवन राम यांनी १९७० ते १९७२ दरम्यान काँग्रेस अध्यक्षपद सांभाळले.
![]()
१२) भारताचे नववे राष्ट्रपती होण्याआधी शंकर दयाल शर्मा काँग्रेसचे अध्यक्ष राहिले होते. त्यांनी अनेक केंद्रीय मंत्रालये सांभाळली होती.
![]()
१३) आसाममधून येणारे देवकांत बरुआ हे इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती, तेव्हा अध्यक्ष होते.
१४) इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांनी पक्षाची धुरा सांभाळली. ते १९९१ पर्यंत काँग्रेस अध्यक्षपदावर होते.
![]()
१५) दोन वेळा रेल्वेमंत्री राहिल्यानंतर कमलापती त्रिपाठी १५ वे काँग्रेस अध्यक्ष झाले. ते १९९२ पर्यंत या पदावर होते.
१६) पी. वी. नरसिम्हा राव प्रधानमंत्री असताना काँग्रेस अध्यक्षाचे पद सांभाळत होते. देशाची आर्थिक स्थिती बदलण्यासाठी त्यांना ओळखण्यात येतं.
![]()
१७) नरसिम्हा राव यांच्या राजीनाम्यानंतर सीताराम केसरी यांना काँग्रेस अध्यक्ष बनवण्यात आलं. १९९७ मध्ये त्यांनी एचडी देवेगौडा सरकार पाडले होते, त्यांचा हा निर्णय सर्वात वादाचा मानला जातो. त्यानंतर आईके गुजराल यांच्या सरकारचे समर्थनही काँग्रेसने काढून घेतले होते. केसरी यांना पक्षातून काढण्याची घटनाही मोठ्या वादाची ठरली.
![]()
१८) १९९८ मध्ये काँग्रेस राजकीय संकटात सापडले होते. अशावेळी काँग्रेसला तारण्यासाठी नेत्यांनी पुन्हा गांधी घराण्याकडे नेतृत्व देण्याचं ठरवलं. सोनिया गांधी यांनी पुढे येऊन पक्षाचे अध्यक्षपद सांभाळले. त्या तब्बल १७ वर्षांपर्यंत काँग्रेसच्या अध्यक्षा राहिल्या. त्यांच्या नेतृत्वात २००४ आणि २००९ मध्ये काँग्रेस सत्तेत राहिली.
१९) राहुल गांधी २०१७ मध्ये पक्षाचे अध्यक्ष झाले. त्यांच्या नेतृत्वात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव झाला. पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे सोनिया गांधी यांना हंगामी अध्यक्षपद स्वीकारावं लागलं.
(edited by- kartik pujari)
from News Story Feeds https://ift.tt/2YKiie3
via IFTTT


No comments:
Post a Comment