कानपूर : उत्तर प्रदेशमधील कानपूर (Kanpur) मधून मोठी बातमी आहे. यूपी एसटीएफ (UP STF) च्या पथकानं कुख्यात गुंड विकास दुबे (Vikas Dubey) चा खात्मा केला आहे. एसटीएफच्या ताफ्यातील ज्या वाहनातून विकास दुबेला कानपूरला नेण्यात येत होते त्याला अपघात झाला. बर्रा पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अपघातात विकास दुबे असलेले वाहन पलटी झाले. मोक्याचा फायदा घेत विकासने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्याला ठार केल्याचे समजते.
One of the vehicles of the convoy of Uttar Pradesh Special Task Force (STF) that was bringing back #VikasDubey from Madhya Pradesh to Kanpur overturns. Police at the spot. More details awaited. pic.twitter.com/7OTruZ2R7h
— ANI UP (@ANINewsUP) July 10, 2020
कानपूरमध्ये एका अधिकाऱ्यासह 8 पोलिसांची हत्या केल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी विकास दुबेला मध्य प्रदेशमधील उज्जेनमधून उत्तर प्रदेशच्या कानपूरला नेण्यात येत होते. तो ज्या वाहनात होता. त्या वाहनाला अपघात झाला. यावेळी त्याने पोलिसांकडील हत्यार हिसकावून घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला. या अपघातात वाहनातील दोन पोलिस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. पोलिसांनी केलेल्या गोळीबारानंतर जखमी झालेल्या विकास दुबेलाही रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. यापूर्वी दुबेचा सहकारी असलेल्या प्रभातसह अन्य काही जणांचा पोलिसांनी खात्मा केला होता.
from News Story Feeds https://ift.tt/2ClCESi
via IFTTT


No comments:
Post a Comment