स्फोटके शोधणे झाले सोपे ! - Maharashtra Mazaa

Latest

Thursday, July 9, 2020

स्फोटके शोधणे झाले सोपे !

https://ift.tt/38ImjDf

पुणे - जम्मू काश्‍मीरसह ईशान्य भारतातील दहशतवादी नायट्रोजन आधारित स्फोटकांचा हल्ल्यांसाठी मोठ्या प्रमाणावर वापर करतात. अशा स्फोटकांचा शोध घेणारे कीट विकसित करण्यात राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या शास्त्रज्ञांना यश आले आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Image may contain: text that says "किटचे फायदे नायट्रोअरोमॅटिक विस्फोटकांची अवैध वाहतूक रोखता येईल अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, ठिकाणांच्या सुरक्षेसाठी महत्वपूर्ण स्फोटानंतर स्फोटकांचा सहज शोध घेणे शक्य"

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) सहकार्याने हे किट विकसित करण्यात आल्याचे एनसीएलचे शास्त्रज्ञ डॉ. संतोष बाबू सुकुमारन यांनी सांगितले. ते सेंद्रिय रसायनशास्त्र विभागातील संशोधनाचे नेतृत्व करत होते. ते म्हणाले, ‘‘बहुतेक स्फोटांमध्ये सहज आणि स्वस्त उपलब्ध होणारे ट्रायनायट्रोटॉल्विन (टीएनटी) हे स्फोटक वापरण्यात येते. राष्ट्रविघातक कृत्यांसाठी अशा स्फोटकांचा वापर करण्यात येतो. यांची अवैध वाहतूक रोखणे आणि स्फोटकांचा माग काढण्यासाठी हे कीट उपयोगी पडेल.’’

Image may contain: text that says "किटची वैशिष्ट्चे एकाच कीटमध्ये फ्ल्युरोसन्ट आणि रंगाधारित दोन पद्धती उपलब्ध टीएनटी स्फोटकांचा ०३५ पीपीएम नमुऱ्याच्या शोध 3 रंगातील दोन प्रकारे शोध डोळ्यांनी रसायनांच्या उपलब्धतेमुळे जलद आणि शोध असलेल्या पट्टीचा वापर. द्रावण पॉलिमर पट्टीवर १) फ्लुरोसन्ट पॉलिमर फ्ल्युरोसन्ट पॉलिमरचे मिलिलीटर ठेवण्यात ठेवण्यातयेते. अतिनील किरणांमध्ये (तरंगलांबी ३६५ नॅनोमीटर) पट्टी ठेवल्यास रंगामध्ये बदल. बदललेल्या आधारे स्फोटकांचा प्रकार निश्चिती. निकालाची अचुकता, संवेदनशीलता विश्वासाहता आणि जलदता पोर्टेवल युव्ही लॅम्प, पेपरच्या पड्या, अमाईन कीटमध्ये समावेश मिथेनॉलसोबत अमाईनचा त्यावर ठेवल्यास १० मिनिटांत बदलतो या प्रकाराने डीएनटी, एनटी आदी नायट्रोअरोमॅटिक स्फोटकांचा शोध शक्य"

मुंबईला नातेवाईकाच्या अंत्यविधीला जाऊन आले आणि...

याबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेचे वैज्ञानिक सल्लागार डॉ. विक्रम कुमार बास्वानी म्हणाले, ‘‘दहशतवाद्यांबरोबरच ईशान्येकडील अतिरेकी अशा स्फोटकांचा वापर करताना दिसतात. प्रामुख्याने इस्त्राईलमधून अशा प्रकारचे कीट आयात केले जाते. एनसीएलने विकसित केलेल्या या किटचा फायदा होईल.’’

हवेलीत कोरोनाची लागण झालेल्या दोघांचा मृत्यू, 20 गावात कंटेनमेंट झोन

प्रत्यक्ष वापरानंतरच किटची उपयुक्तता अधोरेखित होईल. वातावरणातील स्फोटकांशी साम्य असणाऱ्या रसायनांना किट कशी प्रतिक्रिया देते ते बघणे गरजेचे आहे. निश्‍चितच स्वदेशी किटसाठी हे संशोधन महत्त्वपूर्ण आहे. 
- डॉ. विनयकुमार श्रीवास्तव, सहाय्यक संचालक, गृह मंत्रालय, नवी दिल्ली

Edited By - Prashant Patil



from News Story Feeds https://ift.tt/2ZT4Hkd
via IFTTT

No comments:

Post a Comment