वॉशिंग्टन - खोकला किंवा शिंकल्याने बाहेर पडणाऱ्या तुषारांमधून कोरोना विषाणूचा संसर्ग होतो, असे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) सांगितले असले तरी हवेतूनही कोरोनाचा प्रसार होत असल्याचा दावा ३२ देशांमधील २३९ शास्त्रज्ञांनी केला आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
‘द न्यूयॉर्क टाईम्स’ने यासंबंधी वृत्त दिले आहे. कोरोनाचा प्रसार हवेतूनही होत असल्याचा दावा करणाऱ्या शास्त्रज्ञांनी ‘डब्ल्यूएचओ’ आणि ‘रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक केंद्र (सीडीसी) यांना पत्र लिहून या कडे लक्ष देण्याचे आणि मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करण्याची विनंती केली आहे, असे या वृत्तात म्हटले आहे.
चीनमुळे जगाचं खूप मोठं नुकसान; ट्रम्प यांचा पुन्हा हल्लाबोल
‘डब्ल्यूएचओ’चे म्हणणे...
संसर्ग हवेतून होत नाही. तो केवळ थुंकीतील कणांमधून पसरतो. हे कण शिंक, खोकला व बोलताना तोंडावाटून बाहेर पडतात. हे कण हवेतून दूर उडून जाऊ शकतील एवढे हलके नसतात. ते लगेचच जमिनीवर पडतात, अशी माहिती ‘डब्ल्यूएचओ’ने यापूर्वी जाहीर केली होती.
पाकिस्तानच्या मंत्रिमंडळात शिरला कोरोना; काल परराष्ट्रमंत्री तर आज खुद्द...
घरातही ‘एन-९५’ मास्क आवश्यक
न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार नव्या दाव्याबाबत शास्त्रज्ञांनी ‘डब्ल्यूएचओ’ला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शिंकणे, खोकला किंवा मोठ्याने बोलण्यातून बाधित व्यक्तीच्या तोंडाद्वारे अगदी छोटे तुषार हवेतून तरंगत निरोगी व्यक्तीपर्यंत पोचू शकतात. यातून इतरांना संसर्ग होऊ शकतो. यामुळे घरातही ‘एन-९५’ मास्क लावणे आवश्यक आहे.
...म्हणून आम्ही गलवान खोऱ्यातून माघार घेतोय; चीनने दिली कबुली
‘डब्ल्यूएचओ’ची मान्यता नाही
शास्त्रज्ञांच्या या दाव्याविषयी बोलताना ‘डब्ल्यूएचओ’चे तंत्रज्ञान पथकाचे प्रमुख डॉ. बेनडेट्टा अलीग्रंझी म्हणाले की, कोरोनाचा प्रसार हवेतून होऊ शकतो, असे आम्ही गेल्या काही महिन्यांपासून सांगत आहोत. मात्र याबाबत अद्याप पुरावे मिळालेले नाहीत. कोरोनाची सुधारित मार्गदर्शक तत्त्वे ‘डब्ल्यूएचओ’ने २९ जून रोजी जाहीर केली होती. त्यात असे नमूद केले आहे की, एयरोसॉल किंवा पाच मायक्रॉनपेक्षा छोटे तुषार तयार करणाऱ्या हवेतून कोरोनाचा संसर्ग शक्य आहे. एक मायक्रॉन म्हणजे एक सेंटिमीटरचा दहा हजारावा भाग असतो.
एयरोसॉलमध्ये विषाणू नाहीत
संशोधक डॉ. मीर म्हणाले की, शास्त्रज्ञ प्रयोगशाळेत एयरोसॉलमधून हा विषाणू निर्माण करू शकलेले नाहीत. असे तरी हवेतून प्रसार होऊ शकत नाही, असे म्हणता येणार नाही. जे प्रयोग झाले आहेत, त्यातील बहुतेक नमुने रुग्णालयातील चांगल्या वातावरणातून आल्याने संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे.
from News Story Feeds https://ift.tt/2Z4aOTo
via IFTTT


No comments:
Post a Comment