मुंबई: करोना बाधितांचा आकडा राज्यात कमी होत असल्यामुळं समाधान व्यक्त होत असतानाच काल अचानक रुग्णांच्या संख्येत उच्चांकी वाढ झाली. रुग्णांच्या संख्येबरोबर मृतांचा आकडाही वाढत आहे. त्यामुळं प्रशासनाची चिंता काही प्रमाणात वाढली आहे. असं असलं तरी आजपासून राज्याच्या काही भागांत निवडक उद्योगधंदे सुरू होत आहेत. अर्थात, लॉकडाऊनचे नियम पाळून हे अर्थचक्र सुरू होणार आहे. जाणून घेऊन आजच्या दिवसभरातील ताज्या घडामोडी... लाइव्ह अपडेट्स: >> महाराष्ट्रात आतापर्यंत ५०७ रुग्ण करोनामुक्त
>> राज्यातील करोनाबाधितांचा आकडा ४२०० वर, तर आतापर्यंत २२३ जणांचे बळी
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2VKmSX1
via IFTTT


No comments:
Post a Comment