नवी दिल्ली : लॉकडाउन हा केवळ कोरोनाच्या विषाणूला थांवबू शकतो. हरवू शकत नाही. लॉकडाउन हे केवळ पॉझ बटनाप्रमाणे असल्याचे मत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी आणि पत्रकारांशी संवाद साधला.
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
आपण कोरोनाच्या चाचणीच्या क्षमता वाढवल्या तरच आपण कोरोनाशी लढू शकतो. एका जिल्ह्यात कमीतकमी ३५० चाचण्या होणं आवश्यक असल्याचे मतही राहुल गांधी यांनी व्यक्त केले. भारतात चाचण्या कमी आहेत, त्या वाढवणं अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. कोरोनामुळे देशात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात सध्या बेरोजगारीही वाढू लागली आहे. येत्या काळात देशात खाद्यान्नाचीही कमतरता भासेल, सध्या जे अन्नधान्य साठवण्यात आलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचत नसल्याचंही ते म्हणाले. कोरोनाचं संकट हे फार मोठं आहे. त्यामुळे सर्वांमध्ये एकजुट हवी, असल्याचेही राहुल गांधी यांनी सांगितले.
Coronavirus : आम्हाला मदत करा, पाकिस्तानची भारताकडे औषधांची मागणी
गेल्या काही दिवसांपासून मी आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांशी बोलत आहे. देश परदेशातील तज्ज्ञांची माझा संपर्क झाला आहे. मी जे काही बोलत आहे ते त्यांच्याशी झालेल्या चर्चेवर अवलंबून असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. जेव्हा लॉकडाउन संपेल तेव्हा हा करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा जाणवू लागेल. लॉकडाउन हा केवळ हा पॉझ बटनाप्रमाणे आहे. कोरोनाला हरवण्यासाठी केवळ लॉकडाउन पुरेसं नाही असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.
LIVE: Special Congress Party Briefing by Shri @RahulGandhi via video conferencing.#RahulSpeaksForIndia https://t.co/B7FzeIuiXK
— Congress (@INCIndia) April 16, 2020
मला भारत देशात काय चालले आहे यात रस आहे. मला बाकी देश काय करतात यात रस नाही. आजही अनेक प्रश्नाची उत्तरं मिळाली नाहीत. कोरोनानंतर देशासमोर आर्थिक प्रश्न निर्माण होतील, याबद्दल काय करणार हे कोणाकडूनही स्पष्ट करण्यात येत नाही. यावर काय उपाययोजना होणार आहेत हे सांगण्यात आलं नाही. तसंच देशात रोजगाराचा प्रश्न निर्माण होतोय, अन्नधान्याची कमतरता भासेल यावर काय विचार करण्यात आला आहे हेदेखील सांगण्यात आलं नाही. कोरोनाची ही लढाई मोठी आहे. त्याचा सामना योग्य ती धोरणं आखूनच करावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.
जीएसटीची रक्कम राज्य सरकारांना द्यावी....
राज्यांच्या सर्व गरजा केंद्र सरकानं पूर्ण करायला हव्यात. केंद्र सरकारनं जीएसटीची रक्कमही सर्व राज्य सरकारांना द्यावी, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. लघु उद्योगांना वाचवण्यासाठी सरकारनं तरतूद करायला हवी. लहान कंपन्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, केंद्र सरकारनं बेरोजगारी कमी करण्यासाठी काही उपाययोजना करायला हव्यात. तसंच गरीबांना तातडीनं आर्थिक मदत द्यायला हवी, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.
from News Story Feeds https://ift.tt/3agW5XI
via IFTTT


No comments:
Post a Comment