वॉशिंग्टन : जगभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता अमेरिका, स्पेन, भारत, इटली, चीनसह इतर अनेक देशांत कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. यापूर्वी चीनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सर्वाधिक होती. मात्र, आता अमेरिकेत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती समोर आली आहे.
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
संपूर्ण जगात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. यापूर्वी चीनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक होते. त्यानंतर इटलीमध्ये याचा फैलाव मोठ्या प्रमाणात दिसून आला होता. मात्र, आता या दोन्ही देशानंतर अमेरिकेत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सर्वाधिक झाली आहे. इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेत सर्वाधिक 6,13,886 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत.

जगभरात कोरोनाबाधितांची संख्या वाढतीये
संपूर्ण जगाला कोरोनाने विळखा घातला आहे. जगभरात आत्तापर्यंत 19,98,111 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1,26,604 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच जगभरात 4,78,659 रुग्णांवर कोरोनावरील उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे.

अमेरिकेत कोरोनाबाधितांचा आकडा सहा लाख पार
अमेरिकेत सध्या 6,13,886 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. ही संख्या चीन, इटलीच्या तुलनेत सर्वाधिक आहे. तसेच यातील मृतांची संख्या 26,047 वर गेली आहे. तर 13,473 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. यातील विशेष बाब म्हणजे 38,820 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून, ते बरेही झाले आहेत.
from News Story Feeds https://ift.tt/3ch1n6Y
via IFTTT


No comments:
Post a Comment