पालघर साधू हत्याकांड प्रकरण : CM उद्धव ठाकरे यांचं स्पष्टीकरण, दोन पोलिस अधिकारीही निलंबित... - Maharashtra Mazaa

Latest

Monday, April 20, 2020

पालघर साधू हत्याकांड प्रकरण : CM उद्धव ठाकरे यांचं स्पष्टीकरण, दोन पोलिस अधिकारीही निलंबित...

https://ift.tt/eA8V8J

महाराष्ट्राचे मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी पालघर घटनेवर भाष्य करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये झालेल्या साधूंच्या हत्येच्या बातम्या समोर येतायत. अशात पालघरपासून ११० किलोमीटरवर असणाऱ्या गड चिंचले या अत्यंत दुर्गम त्याचसोबत दादरा नगर हवेलीतीपासून नजीकच्या भागातील साधूंच्या हत्येबद्दल स्वतः उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना माहिती दिली. याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या बातम्या पसरवल्या जातायत आणि या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयन्त केला जातोय असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

काय म्हणालेत मुख्यमंत्री 

सदर प्रकरण पालघरमध्ये घडलं असं बोललं जातंय ते खरंतर पालघरपासून खूप दूर असणाऱ्या दुर्गम अशा गड चिंचले या भागातील ही घटना आहे. हा दुर्गम पाडा हे दादरा नगर हवेली सीमेवर असणारं ठिकाण आहे. काही साधू गड चिंचलेमधून गुजरातमध्ये जात होते. यापासून अत्यंत जवळ दादरा नगर हवेलीची सीमा आहे. या सीमेवर त्यांना आडवलं गेलं आणि परत पाठवलं गेलं. अशात परतत असतान त्यांच्यावर तिथे गैरसमजुतीने तिथे हल्ला केला गेला. दादरा नगर हवेलीत त्यांना पोलिसांकडे त्यांना सुपूर्त केलं असतं तर हे घडलं नसतं.

मुंबईतील लॉक डाऊन संपला काय ? हे काय, व्हिडीओ पाहा...  

 

या भागात काही दिवसांपासून चोर फिरत असल्याची अफवा पसरलीये. आणि याच अफवेमुळे या साधूंवरतील हल्ला झाला. या साधूंवर हल्ला होत असताना जवळच्या पोलिसांवर देखील हल्ला झाला. दरम्यान, रात्रीच SP तिथे पोहोचले, पहाटे ५ पासून तिथल्या दुर्गम भागात आरोपींचा शोध सुरु झाला आणि ११० आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत, त्यातील ९ जण अल्पवयीन आहेत. यातील मुख्य पाच आरोपी तुरुंगात आहेत.  

'या' ५ गोष्टी देतायेत अशुभ संकेत; महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये स्थिती होतेय अधिक बिकट?

या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचं काम केलं जातंय, जे पूर्णपणे चुकीचं असल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत. या प्रकरणी तिथल्या दोन पोलिसांच देखील तात्काळ निलंबित केलं गेलंय आणि अतुल कुलकर्णी यांना तिथे शोधकार्य करण्यास सांगितलं आहे. या प्रकरणी फरार आणखी काहींना पकडण्याचे काम सुरु आहे. या प्रकरणाची चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कडे सोपवण्यात आली आहे. 

palghar sadhu case CM uddhav thackeray conducts special press conference



from News Story Feeds https://ift.tt/2VIXDV9
via IFTTT

No comments:

Post a Comment