सोलापूर : महाराष्ट्रातील 13 अकृषिक विद्यापीठांसह देशातील 821 विद्यापीठांमधील सुमारे 4 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांची परीक्षा मार्च-एप्रिलपर्यंत संपतात. मात्र, लॉकडाउमुळे परीक्षा अद्याप झाल्या नसल्याने प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र समित्या स्थापन करुन त्यांचा अहवाल संकलित करण्यात आला आहे. त्यानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाने नियुक्त केलेल्या समितीने देशपातळीवर एकच पॅटर्न निश्चित केला असून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या मान्यतेनंतर त्यानुसार परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
हेही नक्की वाचा : इंजिनिअरिंगच्या प्राध्यापकांची उपासमार : सहा महिन्यांपासून नाही वेतन
महाराष्ट्रातील 13 अकृषिक विद्यापीठांशी साडेपाच हजार महाविद्यालये संलग्नित आहेत. या महाविद्यालयांमध्ये सुमारे 50 लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांच्या परीक्षा झालेल्या नाहीत. दुसरीकडे देशभरातील एकूण विद्यापीठांमध्ये 4 कोटींहून अधिक विद्यार्थी शिकत असून या सर्वच विद्यार्थ्यांच्या परीक्षा एकाच पॅटर्ननुसार घेतल्या जाणार आहेत. त्यानुसार देशातील प्रत्येक राज्यातील विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांची संख्या अन् परीक्षा पध्दती व मूल्यमापनाची माहिती संकलित केली आहे. ग्रामीण भागातील बहूतांश विद्यार्थ्यांकडे इंटरनेट नाही अथवा त्यास अडथळे येतील, असे काही विद्यापीठांनी सांगितले. विद्यापीठ अनुदान आयोगाने स्थापन केलेल्या समितीने या सर्व बाबींचा अभ्यास करुन परीक्षेचा देशपातळीवर एकच पॅटर्न ठरविला आहे. विदेशातील परीक्षा पध्दतीचाही अभ्यास समितीने केल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. ही समिती हरियाणा केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. आर. सी. कुहाड यांच्या अध्यक्षतेखाली असून त्यामध्ये सहा सदस्य असल्याची माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी दिली.
हेही नक्की वाचा : सायबर पोलिस म्हणाले...मद्यपेय घरपोच मिळेल अशा फेक मेसेजवर...
महाविद्यालयीन परीक्षेचा देशभरात एकच पॅटर्न
देशातील सर्वच विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा लॉकडाउनमुळे झालेल्या नाहीत. विद्यापीठ अनुदान आयोगाने डॉ. आर. सी. कुहाड यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षा पध्दती निश्चित करण्यासाठी सहाजणांची समिती स्थापन केली असून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या मान्यतेनंतर चार दिवसांत परीक्षेची पध्दती निश्चित होईल. लॉकडाउन संपल्यानंतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा देशभरात एकाच पॅटर्ननुसार होतील.
- डॉ. भूषण पटवर्धन, उपाध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग
हेही नक्की वाचा : महाविद्यालयीन परीक्षेबाबत मोठा निर्णय ! थेट तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांचीच परीक्षा
ठळक मुद्दे...
- लॉकडाउनमुळे देशातील 821 विद्यापीठांमधील सुमारे 4 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांच्या रखडल्या परीक्षा
- परीक्षेचा पॅटर्न निश्चिती करण्यासाठी डॉ. आर. सी. कुहाड यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती
- समितीने देशातील उच्च शिक्षणमंत्र्यांशी साधला संवाद : लॉकडाउननंतर एकाच पॅटर्ननुसार होणार परीक्षा
- समितीने निश्चित केलेला परीक्षेचा पॅटर्न मंजुरीसाठी आता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयास सादर
- केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या मान्यतेनंतर चार दिवसांत जाहीर होणार युजीसीचा देशपातळीवरील परीक्षा पॅटर्न
from News Story Feeds https://ift.tt/3bhsD5m
via IFTTT


No comments:
Post a Comment