राज्यात १६५ नवे रुग्ण; आकडा ३ हजारच्या पुढे - Maharashtra Mazaa

Latest

Thursday, April 16, 2020

राज्यात १६५ नवे रुग्ण; आकडा ३ हजारच्या पुढे

https://ift.tt/3b9mgkm
मुंबई: राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येनं तीन हजारचा टप्पा ओलांडला आहे. मागील १८-२० तासांत राज्यभरात तब्बल १६५ नव्या रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या ३०८१ झाली आहे.

नव्यानं नोंद झालेल्या रुग्णांमध्ये एकट्या मुंबईतील १०७ रुग्णांचा समावेश आहे. तर, पुण्यात १९ रुग्ण वाढले आहेत. नागपूर महापालिकेच्या हद्दीत १० रुग्ण आढळून आले असून जिल्ह्यात एक जण कोविड पॉझिटिव्ह आढळून आला आहे. ठाणे शहरासह जिल्ह्यात १३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. नवी मुंबई व वसई-विरारमध्ये प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आहेत. उत्तर महाराष्ट्रातील करोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावत आणखी चार रुग्ण सापडले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतही ४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. अहमदनगर, चंद्रपूर व पनवेल शहरात प्रत्येकी एकाला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Vx8HVd
via IFTTT

No comments:

Post a Comment