उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पितृशोक - Maharashtra Mazaa

Latest

Monday, April 20, 2020

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पितृशोक

https://ift.tt/eA8V8J

लखनौ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांचे आज (ता. २०) सोमवारी निधन झाले. योगी आदित्यनाथ यांचे वडील आनंद सिंह बिष्ट यांनी सोमवारी सकाळी १० वाजून ४४ मिनिटांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आनंद सिंह बिष्ट यांना लिवर आणि किडनीची समस्या होती. त्यांची तब्येत गंभीर असल्याचे सांगण्यात येत होते. त्यांना गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर आज त्यांचे निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.

मंगळवारी हरिद्वारमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) अवनीश के. अवस्थी यांनी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांचे आज सकाळी १० वाजून ४४ वाजता निधन झाले असल्याचे सांगत दु:ख व्यक्त केले आहे.



from News Story Feeds https://ift.tt/2RSIUG1
via IFTTT

No comments:

Post a Comment