धारावी करोनाचा हॉटस्पॉट; ४ नवे रुग्ण सापडले - Maharashtra Mazaa

Latest

Monday, April 13, 2020

धारावी करोनाचा हॉटस्पॉट; ४ नवे रुग्ण सापडले

https://ift.tt/2VlMjOJ
मुंबई: करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत आज आणखी ४ नवे करोना रुग्ण सापडले असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे धारावीतील करोनाबाधितांची संख्या ४७ झाली असून मृतांची संख्या ५ वर पोहोचली आहे. आज सापडलेल्या चार रुग्णांपैकी एक करोनाबाधित महिला ही दादरच्या सुश्रृषा हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. धारावीत आज सापडलेल्या चार नव्या रुग्णांपैकी एका ६० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सायन हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. हा रुग्ण धारावीच्या नेहरू चाळमध्ये राहतो. तर इतर तीन रुग्णांपैकी एक रुग्ण इंदिरा नगर, जनता हौसिंग सोसायटी आणि गुलमोहर चाळीत राहतात. यात दोन महिलांचा समावेश आहे. करोनाची लागण झालेली गुलमोहर चाळीतील ३४ वर्षीय महिला दादरच्या सुश्रृषा रुग्णालयात नर्स आहे. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या शिवाय त्यांच्या कुटुंबीयांचे सँपल घेण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. धारावीत आतापर्यंत डॉ. बलिगा नगर, मुस्लिम नगर, जनता सोसायटीमध्ये प्रत्येकी ५, मुकुंद नगरमध्ये ९, वैभव अपार्टमेंट, मदिना नगर, कल्याणवाडीमध्ये प्रत्येकी दोन, धनवाडा चाळ, पीएमजीपी कॉलनी, मुरुगन चाळ, राजीव गांधी चाळ, नेहरू चाळ, इंदिरा चाळ आणि गुलमोहर चाळीमध्ये प्रत्येकी एक, सोशल नगरमध्ये ६ आणि शास्त्रीनगरमध्ये ४ रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी डॉ. बलिगा नगरमध्ये दोन, सोशल नगर, कल्याणवाडी आणि नेहरू चाळीमधील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2XxGsse
via IFTTT

No comments:

Post a Comment