करोना रोखण्यासाठी पालिकेने घेतला 'हा' निर्णय - Maharashtra Mazaa

Latest

Thursday, April 16, 2020

करोना रोखण्यासाठी पालिकेने घेतला 'हा' निर्णय

https://ift.tt/2yl2J20
मुंबई: मुंबईतील करोना रुग्णांची संख्या रोखण्यासाठी महापालिकेने करोना रुग्णांच्या टेस्ट सिस्टिममध्ये महत्त्वपूर्ण बदल केला आहे. यापूर्वी संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांची तात्काळ टेस्ट करायची. त्यामुळे त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह यायचा. मात्र त्याच व्यक्तीला काही दिवसाने करोना झाल्याचं स्पष्ट व्हायच. यापार्श्वभूमीवर संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची टेस्ट तात्काळ न करता पाच दिवसांच्या देखरेखीनंतरच त्याची टेस्ट करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबईतील करोना रुग्णांची संख्या घटणार असून टेस्टसाठी लागणारा वेळही वाचणार आहे. करोनाबाधिताच्या घरातील व्यक्तीमध्ये करोनाची लक्षणे जाणवत नसतील तर त्याची तात्काळ तपासणी करण्यात येणार नाही, असं पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं. पालिकेने तसं परिपत्रकही काढलं आहे. त्यातही गोष्ट नमूद करण्यात आली आहे. करोनाबाधितांच्या संपर्कातील लोकांमध्ये तात्काळ करोनाची लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे पाच दिवस देखरेख करूनच त्यांची टेस्ट करण्यात यावी, असं या परिपत्रकात नमूद केलं आहे. आयसीएआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच हे परिपत्रक काढण्यात आलं आहे. पाच दिवसानंतर बाधिताच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची टेस्ट केली तर रुग्णांची संख्याही कमी होईल, असं पालिकेचं म्हणणं आहे.

योग्यवेळी करोना व्यक्तीची तपासणी केली तरच ती तपासणी यशस्वी ठरते. करोनाची लक्षणे ५ ते १४ दिवसांच्या आत दिसून येतात. त्यामुळे संशयितांची आधीच तपासणी केल्यास करोना रुग्णांची टेस्ट निगेटिव्ह येते. पाच दिवसानंतरच ही चाचणी केली तर पॉझिटिव्ह केसेसची माहिती मिळू शकते. त्यामुळे रुग्णांना वाचवता येऊ शकते, असं पालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी नवभारत टाइम्सशी बोलताना सांगितलं. दरम्यान, मुंबईत बुधवारपर्यंत करोनाचे १९३६ रुग्ण होते. त्याशिवाय मुंबईत ४३ हजार २४९ लोकांना क्वॉरंटाइन ठेवण्यात आलं आहे. क्वॉरंटाइन करण्यात आलेल्या रुग्णांपैकी ३२७१ रुग्णांना सरकारने क्वॉरंटाइन केलं आहे. आतापर्यंत पालिकेने ३० हजाराहून अधिक टेस्ट केल्या आहेत. पालिका रोज २२०० टेस्ट करत असल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ewr852
via IFTTT

No comments:

Post a Comment