युरोपमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. इटली, ब्रिटनसारखे सक्षम आरोग्ययंत्रणा असलेले देशही हतबल झाले आहे. अशावेळी जर्मनी आणि ऑस्ट्रिया हे त्यांचे शेजारी देश मात्र कोरोनाशी यशस्वी मुकाबला करताना दिसत आहेत. इतरांच्या तुलनेत या दोन देशांमध्ये रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण कमी आहे. या दोघांनी असे काय केले की त्यांना संसर्ग आटोक्यात आणता आला? या देशांमध्ये तर सिगारेट ओढणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. सामाजिक अंतराचे नियम इतर युरोपीय देशांपेक्षा कमी कडक आहेत.
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
जर्मनी आणि ऑस्ट्रिया कोरोनाशी यशस्वी मुकाबला करणारे देश
जर्मनी आणि ऑस्ट्रिया या देशांनी सर्व वयोगटांमधील सर्व संशयितांची चाचणी घेतली. यामुळे रुग्णसंख्येचा आणि पर्यायाने संसर्गाचा त्यांना अचूक अंदाज आला. जर्मनीमध्ये एकूण बाधितांपैकी ८० टक्के जण साठीच्या आतील आहेत, तर ऑस्ट्रियामध्ये बहुतांश बाधित ४५ ते ५४ या वयोगटांतील आहेत. इतर देशांमधील निष्कर्षापेक्षा हा निष्कर्ष वेगळा आहे. इतर देशांमध्ये चाचण्यांचे प्रमाण कमी असल्याने त्यांचे अनुमान चुकल्याची शंका यामुळे उत्पन्न होते.
अचूक संख्या
भरपूर चाचण्या घेतल्याने जर्मनी आणि ऑस्ट्रिया देशांना त्यांच्याकडील रुग्णसंख्येचा अचूक अंदाज काढता आला. त्याचा परिणाम म्हणून त्यांच्या कामाची दिशा स्पष्ट झाली आणि निश्चित धोरणे राबविता आली.
संसर्गाची लवकर जाणीव
विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट होऊनही इटली, ब्रिटनसारखे देश गाफील राहिले. जर्मनीने मात्र तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली. त्यांनी चाचण्या करण्यावर भर दिला. आता दररोज दोन लाख चाचण्या करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
तज्ज्ञांचा आदर
जर्मनी आणि ऑस्ट्रियाने कायमच कोरोनाच्या संसर्गाबाबत तज्ज्ञांनी जे सांगितले ते गांभीर्याने घेत त्यानुसार अंमलबजावणी केली. इतर बहुतेक देशांनी मात्र सुरवातीला सर्व इशारे धुडकावून लावले होते.
योग्य व वेगवान कार्यवाही
संसर्गग्रस्तांची संख्या, विविध भागांतील त्यांचे प्रमाण याची माहिती हाताशी येताच या दोन देशांनी, विशेषतः जर्मनीने वेगाने उपाययोजना केल्या. नागरिकांना क्वारंटाइन करणे, त्यांना तातडीने उपचार उपलब्ध करून देणे, अशा गोष्टी केल्या गेल्या.
सामाजिक विमा
या दोन्ही देशांनी जनतेच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांचा विमा उतरवून उपचारासाठी पुढे येण्यासाठी प्रोत्साहन दिले. या काळात त्यांनी रुग्णालयांची क्षमता वाढविली. जर्मनीमध्ये दर एक लाख लोकांमागे ६२१ आणि ऑस्ट्रियामध्ये ५८० खाटा उपलब्ध आहेत.
नियम पालन
जर्मनीमध्ये काटेकोरपणे नियम पाळले जातात. येथे सिग्नलही तोडला जात नाही. गर्दीतही शिस्त असते. हे गुण या कठीण काळात कामाला आले. सामाजिक अंतर, मास्क याबाबत सरकारचे नियम सर्वांनी पाळले.
from News Story Feeds https://ift.tt/2RzL6C2
via IFTTT


No comments:
Post a Comment