मुंबई: लॉकडाऊन झुगारून मंगळवारी रस्त्यावर आलेल्या परप्रांतीय मजुरांच्या मुद्द्यावरून राजकारण रंगलं आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं ही घटना घडल्याचा आरोप करणारे पर्यावरणमंत्री यांना भाजपचे आमदार यांनी पत्र लिहिलं आहे. मजुरांच्या अस्वस्थतेच्या कारणाची जंत्रीच शेलार यांनी त्यात मांडली असून मोबाइल रिचार्ज संपणं हे एक कारण असल्याचं शेलार यांनी म्हटलं आहे. आशिष शेलार यांचा मतदारसंघ असलेल्या वांद्रे पश्चिमेला मजुरांच्या निदर्शनाचा हा प्रकार घडला होता. त्यामुळं शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यासह महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना लिहिलेल्या पत्रात काही गोष्टी निदर्शनास आणून दिल्या आहेत. शेलार यांनी या पत्राद्वारे मोबाइल रिचार्जचा मुद्दा उपस्थित केला आहे. 'बहुतांश कामगार हे प्रीपेड मोबाइल वापरतात. त्यांच्या मोबाइलचे रिचार्ज आता संपत आले आहे. मोबाइल रिचार्जची दुकानं सुरू नसल्यानं व ऑनलाइन रिचार्ज करणं सर्वांनाच शक्य नसल्यानं त्यांची कोंडी झाली आहे. गावाकडं असलेल्या कुटुंबीयांशी, नातेवाईक व मुकादमाशी त्यांचा संपर्क तुटू लागला आहे. त्यातून त्यांच्यात अस्वस्थता आहे. त्यामुळं या कामगारांसाठी मोबाइल रिचार्जची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेलार यांनी पत्रात केली आहे. शेलार यांच्या मागण्या >> वांद्रे पश्चिमकेडील ज्या परिसरात हा जमाव जमला होता, त्या परिसरातील सर्व रहिवाशांच्या वैद्यकीय तपासण्या कराव्यात व संपूर्ण परिसर निर्जंतूक होत नाही तोपर्यंत तो कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात यावा. >> जिथून एकही ट्रेन राज्याबाहेर जात नाही तिथं हे मजूर कसे आणि कोणाच्या सांगण्यावरून एकत्र आले, याची चौकशी करा >> मुंबईतील सर्व मजुरांच्या रेशनची आणि जेवणाची तातडीनं व्यवस्था करा >> केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार, सर्व मजुरांना तात्काळ आर्थिक मदत द्या >> स्थलांतरित मजुराच्या आरोग्याचा प्रश्नही महत्त्वाचा आहे. करोनाच्या दृष्टीनं त्यांच्याही वैद्यकीय तपासण्या करा.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3enMy4n
via IFTTT


No comments:
Post a Comment