मरकजमध्ये सहभाग; १५६ जणांविरोधात गुन्हे - Maharashtra Mazaa

Latest

Sunday, April 12, 2020

मरकजमध्ये सहभाग; १५६ जणांविरोधात गुन्हे

https://ift.tt/3c58HT4
मुंबई: व्हिसा नियमांचं उल्लंघन करून दिल्लीतील निजामुद्दीन मरकज कार्यक्रमात सहभागी झालेल्या १५६ विदेशी नागरिकांविरोधात राज्याच्या विविध भागात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, अमरावती, नांदेड, नागपूर, पुणे, अहमदनगर, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्याचे गृहमंत्री यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. राज्यात लॉकडाऊन सुरू असून या काळात व्हिसा नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी त्यांच्या विरोधात फॉरेन अॅक्ट कायदा १५बी व भादंविच्या कलम १८८, २६९ आणि २७० अन्वये १५ गुन्हे दाखल केले आहेत. हे सर्वजण टुरिस्ट व्हिसावर भारतात आले होते. मात्र व्हिसा नियमांचं उल्लंघन करून हे सर्वजण दिल्लीतील निजामुद्दीन येथे पार पडलेल्या मरकजमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून या सर्वांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. गुन्हे दाखल करण्यात आलेल्या विदेशी नागरिकांमध्ये कजाखस्तानच्या ९, दक्षिण आफ्रिकेच्या एका, बांगलादेश १३, ब्रुनेई ४, आयवरी कोस्ट ९, इराण १, टोगो ६, म्यानमार १८, मलेशिया ८, इंडोनेशिया ३७, बेनिन १, फिलपाइन्स १०, अमेरिका १, तंजानिया ११, रशिया २, जिबोती ५, घाना १ आणि किर्गिजस्तानच्या १९ नागरिकांचा समावेश आहे, अशी माहिती देशमुख यांनी ट्विटमध्ये दिली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2JZtzze
via IFTTT

No comments:

Post a Comment