शिस्तप्रिय जपानमध्ये संपूर्ण लॉकडाऊन नाही; वाचा जपानची स्थिती - Maharashtra Mazaa

Latest

Monday, April 13, 2020

शिस्तप्रिय जपानमध्ये संपूर्ण लॉकडाऊन नाही; वाचा जपानची स्थिती

https://ift.tt/eA8V8J

Fight with Coronavirus : सध्या जगभरात कोरोनाने त्याचा प्रकोप सुरूच ठेवला असून दिवसेंदिवस त्याचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जगभरात सध्या कोरोनाचे  १८,५४,००० पेक्षा जास्त रुग्ण झाले असून यातील १,१४,२९० लोकांचा मृत्यू झालेला आहे. संपूर्ण जगात सध्या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून फक्त अत्यावश्यक सेवाच सध्या उपलब्ध आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नागरिकांना सोशल डीस्टंसिंग पाळायला सांगण्यात आले असून कमीत कमी लोकांच्या संपर्कात येण्याचा सल्ला देण्यात येत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी स्वच्छता पाळणे हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा असून नागरिकांना स्वच्छता ठेवण्यासोबत मास्क आणि सॅनिटायझरचा वापर सुद्धा करायला सांगण्यात आले आहे. ह्या सर्व गोष्टी पाळत असताना नागरिकांमध्ये स्वयंशिस्त असणे फार महत्वाचे आहे. जपानी नागरिक त्यांच्या याच शिस्तीसाठी ओळखले जातात म्हणूनच कि काय जपानमध्ये कोरोनाला रोखण्यात खूप मोठ्या प्रमाणात यश आले असून तेथील नागरिक पंतप्रधान शिंजो आबे यांनी सांगितलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहेत.

आणखी वाचा - हॉटेल चालकांना भीती लॉकडाऊननंतरच्या मंदीची

कसा आला कोरोना?
नोव्हेंबर २०१९ मध्ये चीनच्या वूहान प्रांतात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर त्याचा प्रसार फार मोठ्या प्रमाणात होऊ लागला. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात चीननंतर सर्वात जास्त त्याचा परिणाम जपानवर होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली. चीनमधून निघालेल्या डायमंड प्रिन्सेस जहाजावर २५०० पेक्षा जास्त नागरिक प्रवास करत होते आणि त्याच जहाजावर कोरोनाचे रुग्ण असल्याची बातमी आली व ते जहाज जपानमध्ये थांबविण्यात आले व त्यांच्यातील कोरोना रुग्णावर उपचार सुरु करण्यात आले. जहाजावरील सर्व नागरिकांना आयसोलेशन मध्ये सुद्धा ठेवण्यात आले होते. परंतु जपानमध्ये याप्रकारे कोरोनाचा संसर्ग होण्यास सुरवात झाली होती.

आणखी वाचा - कायम शेतीवरच का फिरतो नांगर?

कसा आहे लॉकडाऊन ?
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात जपानच्या पंतप्रधान शिंजो आबे यांनी तेथील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. व तसेच तेथे असणाऱ्या मोठ्या प्रमाणातील सर्व आयटी कंपन्यांना वर्क फ्रॉम होमचा आदेश देण्यात आला. तसेच तेथील अत्यावश्यक सेवा २४ तास चालू ठेवून नागरिकांना आपापल्या घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले व गरज नसताना बाहेर पडू नये असे सांगण्यात आले. संपूर्ण जपानमध्ये सोशल डीस्टंसिंग पाळण्याचा आदेश काढत एकमेकांना भेटण्यास बंदी घालण्यात आली. सर्वाना आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे सुद्धा आवाहन करून ज्यांना कोरोनाची लक्षणे दिसत आहेत त्यांना व त्यांच्या परिवाराची चाचणी घेण्यात आली. आज जपानमध्ये कोरोनाचे ७३७० रुग्ण असून त्यातील १२३ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे व ७८४ रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून उर्वरित ६४६३ पैकी १२९ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे व बाकी सर्व लवकरच पूर्णपणे बरे होतील असे सांगण्यात आले आहे.

आणखी वाचा - सोशल डिस्टंसिंग जर्मनीकडून शिका!

कशी पाळली जाते शिस्त?
जपानी नागरिक हे स्वयंशिस्त पाळतात. जपानमध्ये रात्रीच्या तीन वाजता सुद्धा तेथील नागरिक रस्त्यांवरील सिग्नल पाळतात. जपानी नागरिक स्वतःचे काम स्वतःच करत असल्यामुळे तेथे कोणीही नोकर नसतो. जपान एक स्वच्छ देश म्हणून ओळखला जातो कारण त्या देशाची स्वच्छता फक्त सफाई कामगार नाही तर त्या देशाचे नागरिक सुद्धा करतात, तसेच तेथील लहान मुलांना प्रत्येक सुट्टीच्या दिवशी सरकारी उद्यानांमध्ये सफाईचे धडे दिले जातात. कोरोनामुळे जगभर मास्क व सॅनिटायझर वापरण्यात सांगण्यात येत असले तरी जपानी नागरिक पूर्वीपासूनच हि गोष्ट काटेकोरपणे पाळत आहेत. तिथे सामान्य दिवशी सुद्धा नागरिक मास्क घातलेले दिसतात. जपानचे नागरिक शिस्तप्रिय असून आपल्या देशातील सरकारच्या प्रत्येक नियमांचे पालन ते करतात. जपानी नागरिक सहसा एकत्रित येत गप्पा गोष्टी करत बसत नाहीत व एकमेकांना ते भेटत नाहीत या गोष्टींचा सुद्धा त्यांना कोरोनाचा प्रसार रोखण्यात फायदा होत आहे. जपानमध्ये निरोगी राहण्याला प्राधान्य दिले जाते यामुळेच तेथील वयस्कर नागरिक सुद्धा निरोगी असल्याचे दिसते. याचप्रकारे जगातील सर्वात जास्त शिस्तप्रिय असणाऱ्या जपानने कोरोनावर आपल्या आधीपासूनच्या शिस्तीमुळे कोरोनाला रोखण्यात यश मिळविले आहे.



from News Story Feeds https://ift.tt/3ehSjk3
via IFTTT

No comments:

Post a Comment