ग्रीन, ऑरेंज झोनमधील उद्योग अंशत: सुरू; जिल्हाबंदी कायम - Maharashtra Mazaa

Latest

Sunday, April 19, 2020

ग्रीन, ऑरेंज झोनमधील उद्योग अंशत: सुरू; जिल्हाबंदी कायम

https://ift.tt/2KmmJUp
मुंबई: राज्यात जाहीर होऊन उद्या सहा आठवडे पूर्ण होत आहेत. या काळात करोनामुळे राज्याचं अर्थचक्र रुतलं आहे. हे आर्थिक चक्र फिरलंच पाहिजे. त्यासाठी पुन्हा गणपती बाप्पा मोरया म्हटलंच पाहिजे, असं सांगतानाच करोनाच्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये येणाऱ्या काही जिल्ह्यातील उद्योगांना माफक स्वरुपात परवानगी देण्यात येणार आहे. या जिल्ह्यात मालवाहतूक सुरू राहिल, दोन जिल्ह्यांमध्ये मालवाहतूक करता येणार नाही. तसेच सर्व सामान्यांसाठीही जिल्हाबंदी कायम राहणार आहे, असं मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा राज्यातील जनतेशी फेसबुकवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी करोनाच्या संकटाची नागरिकांना जाणीव करून देतानाच राज्यासमोरच्या आर्थिक संकटाचीही जाणीव करून दिली. गेल्या महिन्यात २० तारखेला सर्व ठप्प झालं होतं. आपलं अर्थचक्र त्यानंतर करोनाच्या संकटात रुतलं. हे अर्थचक्र फिरलंच पाहिजे. त्यासाठी उद्यापासून काही ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पा मोरया म्हणावंच लागेल. आपण करोनाच्या पार्श्वभूमीवर तीन झोन तयार केले आहेत. त्यापैकी ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये माफक प्रमाणात उद्योग सुरू करता येईल. जिल्ह्यातल्या जिल्ह्यात मालाची ये-जा करता येईल. पण कुणालाही एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार नाही. जिल्हाबंदी कायम असेल, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तसेच कामगारांची कारखान्याच्या आवारात काळजी घेत असाल तर राज्य सरकार तुम्हाला मदत करेल, असंही ठाकरे यांनी सांगितलं. व्हायरसची वाहतूक करायची नाही एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास कुणालाही परवानगी दिली जाणार नाही. ३ मेपर्यंत ही बंदी कायम असेल. मी मालवाहतुकीला अंशत: परवानगी दिली आहे. मालवाहतूक होणार आहे. मला व्हायरसची वाहतूक करायची नाही. कोणताही धोका पत्करायचा नाही, असंही त्यांनी सांगितलं. सरणार कधी रण... यावेळी त्यांनी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या गाण्याच्या ओळींतून करोनाची दाहकता सुरुवातीलाच सांगितली. सरणार कधी हे रण... अशी संपूर्ण जगाची अवस्था झाली आहे. हे रण कधी संपणार त्याची आपण वाट पाहत आहोत. हा शत्रू दिसत नाही. दिसला असता तर एक घाव दोन तुकडे केले असते. पण हा शत्रू दिसत नाही. त्यामुळे या युद्धाला संयम, धैर्य आणि जिद्दीने आपल्याला सामोरे जायचं आहे, असंही ते म्हणाले. मुलांना भावूक आवाहन यावेळी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत देणाऱ्या लहान मुलांचं कौतुक करतानाच मुख्यमंत्र्यांनी त्यांना भावूक आवाहनही केलं. लहान मुले त्यांच्या खाऊचा पैसा, वाढदिवसाचा पैसा आणि खेळणी घेण्यासाठी साठवलेला पैसा मुख्यमंत्री निधीला देत आहेत. काय बोलायचं या बालगोपाळांना? त्यांच कौतुक केलं पाहिजे. त्यांना आशीर्वादही दिला पाहिजे, पण मुलांना तुम्ही तुमचा साठवलेला पैसा नका देऊ. आम्ही खंबीर आहोत. महाराष्ट्र सरकार खंबीर आहे. आमची पिढी खंबीर आहे, असं सांगतानाच तुम्ही पैसा साठवू नका. काळजी करू नका. आम्ही जे काही करत आहोत, ते तुमच्या भवितव्यासाठीच करत आहोत. हे युद्ध आपण जिंकणारच आहोत, असंही ते म्हणाले. रेल्वे, विमानसेवाही बंद राहणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे लॉकडाऊनचे नियम सर्वांना पाळायचे आहेत. या काळात रेल्वे आणि विमान सेवा सुरू होणार नाही, असं सांगतानाच सर्वांना लॉकडाऊनचे नियम पाळायचेच आहे. घरातच सर्वांना थांबायचं आहे. गरज असेल तरच मास्क लावून घराबाहेर पडा. आपल्याला करोना विरोधात लढायचं आहे आणि हे युद्ध जिंकायचंच आहे, असंही त्यांनी सांगितलं. मुंबई-पुण्यात घरोघरी वृत्तपत्र टाकणं योग्य नाही वृत्तपत्रं वितरणावर आणि स्टॉल्सवर ठेवण्यावर बंदी नाही. पण मुंबई-पुणे हे रेड झोन आहेत. त्यामुळे या ठिकाणी घरोघरी जावून वृत्तपत्रं टाकणं योग्य नाही. घरोघरी वृत्तपत्रांचं वितरण नकोच. माझी भीती अनाठायी असेलही. ते नंतर कळेलही. पण आरोग्यविषयक आणीबाणीच्या काळात मला हा धोका पत्करायचा नाही, असं सांगतानाच वृत्तपत्रांच्या मालक आणि काही संपादकांशी माझी चर्चा झाली. त्यांना समजावून सांगितलंय, असंही ते म्हणाले. येत्या एक-दोन दिवसात मुंबई-पुणे वगळता इतर जिल्ह्यांसाठी वृत्तपत्रं वितरणाबाबत काही निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी सांगितलं. घरगुती हिंसाचारासाठी १०० नंबरवर डायल करा यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घरगुती हिंसाचाराच्या घटना घडू नये आणि अशा घटना घडल्यास महिलांना तक्रारी करता याव्यात म्हणून एक हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. घरगुती हिंसाचाराची तक्रार करायची असेल तर १०० या नंबरवर संपर्क करावा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. समुपदेशनासाठी १८००१२०८२००५० या क्रमांकावर संपर्क साधा लॉकडाऊनमुळे नागरिकांना घरात राहावं लागत आहे. अशावेळी मानसिक अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे. शिवाय एकटेपणा वाढला, बैचनी वाढली आणि समुपदेशनाची गरज असेल तर मुंबई महापालिका आणि बिर्ला यांच्या १८००१२०८२००५० क्रमांकावर तसेच आदिवासी विकास विभाग / प्रोजेक्ट मुंबई आणि प्रफुलता यांच्या १८००१०२४०४० क्रमांकावर जरूर संपर्क साधा, असं आवाहनही करण्यात आलं आहे. >> काल संध्याकाळच्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत आपण ६६ हजार ८०० टेस्ट केल्या त्यापैकी किमान ९५ टक्के निगेटिव्ह >> राज्यात ३६०० पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत >> ७५ टक्के अति सौम्य लक्षणे असलेले आहेत. ५२ रुग्ण गंभीर असून गंभीर रुग्णांना वाचवणे याकडे लक्ष केंद्रित केले आहे >> कोणतेही लक्षण लपवू नका. न घाबरता फिव्हर क्लिनिकमध्ये लगेच जा. लवकर या, लवकर इलाज होईल. गंभीर झालेले रुग्ण देखील बरे झाले आहेत. पण वेळेत आले पाहिजे >> काल संध्याकाळी खासगी क्लिनिक आणि डॉक्टर्सशी बोललो. ते देखील लढ्यासाठी तयार आहेत. हे सर्व जण आज उद्यापासून कोरोना नसलेल्या रुग्णांना तपासतील. >> गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या आकड्यांत घट होते आहे. पण मला भ्रमात राहायचे नाही. आकडेवारी वर खाली होते आहे


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ctLsST
via IFTTT

No comments:

Post a Comment