पुणे: ससून रुग्णालयात बुधवारी रात्रीपासून आतापर्यंत तीन महिला रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं पुण्यातील करोना बळींची संख्या ४६ वर पोहोचली आहे. त्यापैकी तब्बल ३७ मृत्यू ससूनमध्ये झाले आहेत. ससूनमध्ये मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये तिन्ही महिला आहेत. शिवाजीनगर वाकडेवाडी येथील ६५ वर्षीय महिलेला ३ एप्रिल रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तिला करोनाची लागण झाली होती. त्याशिवाय तिला रक्तदाबही होता. बुधवारी रात्री उशिरा तिचा मृत्यू झाला. गंज पेठेतील ५४ वर्षांच्या महिलेवर १३ एप्रिलपासून उपचार सुरू होते. तिला मधुमेहाबरोबरच इतरही आजार होते. तिची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. कोंढव्यातील ४७ वर्षांच्या एका महिलेवर ९ एप्रिल पासून उपचार सुरू होते. त्यांना करोनाची लागण झाली होती. तिला मधुमेह तसंच किडनीचा विकार होता. तिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2VexOgw
via IFTTT


No comments:
Post a Comment