मुंबई: 'प्रत्येक माणूस हा मुळात स्वाभिमानी असतो. शक्यतो त्याला मदत घेणं नको असतं. पण आज प्रसंगच बाका असल्यानं नाईलाजानं अनेकांना मदत स्वीकारावी लागत आहे. मात्र, अशावेळी मदतकर्त्यांनी गॉगल लावून स्वत:सह मदत स्वीकारणाऱ्यांचे फोटो काढणं योग्य आहे का? प्रत्येकानं याचा विचार करावा,' असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांनी मनसे कार्यकर्त्यांसह सर्वांनाच केलं आहे. करोना साथीच्या पार्श्वभूमीवर सध्या सरकारसह सर्वसामान्यांनाही अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहेत. हातावर पोट असलेले लाखो लोक सरकारच्या, स्वयंसेवी संस्थांच्या व दानशूरांच्या मदतीवरच तगून आहेत. त्यांच्यासाठी मदतीचा ओघ सुरू आहे. मात्र, ही मदत देताना फोटो व व्हिडिओच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी केली जात आहेत. राज ठाकरे यांना ही बाब खटकली आहे. सोशल मीडियावरील एका सविस्तर पोस्टच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी त्यावर भाष्य केलं आहे. वाचा: 'कॅमेऱ्याकडं बघून मदतकार्याची छायाचित्रं काढणं, मदत स्वीकारणाऱ्यास कॅमेऱ्यात बघण्यास सांगणं अशा चुकीच्या गोष्टी काही लोक करत आहेत. ज्याला आपण मदत करत आहोत त्याचा चेहरा दाखवून आपण त्याला लाजवत नाही का? असं करून एखाद्याला शरमेनं मान खाली घालायला लावणं कितपत योग्य आहे,' असा सवाल राज यांनी केला आहे. वाचा: मनसेच्या कार्यकर्त्यांबरोबरच अन्य पक्षातील कार्यकर्त्यांनीही याचा विचार करावा. महाराष्ट्राची परंपरा निरपेक्ष सेवेची आहे. त्या परंपरेचं दर्शन आपण पुन्हा एकदा घडवूया,' असं त्यांनी म्हटलं आहे. सामाजिक संस्थांनी मदतकार्य करताना स्वत:ची, आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. आक्रमक नेते अशी ओळख असलेल्या राज ठाकरे यांनी नेहमीपेक्षा वेगळ्या शैलीत लिहिलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3bbXfoI
via IFTTT


No comments:
Post a Comment