सोलापूर : कोरोना या विषाणूचा विळखा आता दिवसेंदिवस वाढू लागल्याने गावोगावी स्थापन केलेल्या ग्राम समितीच्या सदस्यांना गावात राहणे बंधनकारक केले आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बुधवारी (ता. 15) तसे आदेश काढले. समितीच्या सदस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्या गावातील 25 ते 30 जणांचा व्हॉटस्अप ग्रूप तयार केला जाणार आहे. तर आंतररजिल्हा व आंतरराज्य मार्गांवरुन कोणीही ये-जा करु नये म्हणून दहा सदस्यांचे ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.
हेही नक्की वाचा : परीक्षेबाबत मोठी बातमी ! थेट तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांचीच परीक्षा
सोलापूर जिल्ह्यात येणारे एकूण 212 आंतरराज्य व आंतरजिल्हा मार्ग आहेत. या मार्गावरील 175 गावांमध्ये बंदोबस्तासाठी 500 पोलिस व होमगार्डची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जोडीला आरसीपी जवानांच्या तीन तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या गावांमध्ये बाहेरुन कोणीही येणार नाही आणि गावातून बाहेर जाणाऱ्यांची माहिती संकलित करण्यासाठी दहा सदस्यांचे ग्राम सुरक्षा दल स्थापनेचा निर्णय पोलिस अधीक्षकांनी घेतला आहे. त्यांना ओळखपत्र, मास्क, सॅनिटायझर, शिट्टी दिली जाणार असून संबंधित तालुक्याचे तहसिलदार व पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्यांना ही समिती नियमित माहिती देईल, असेही पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे. 212 मार्गांपैकी केवळ 30 मार्गांवरुन अत्यावश्यक सेवेची वाहतूक सुरु राहील, असेही त्यांनी सांगितले. बंद केलेल्या रस्त्यांवरील गावांमधील दोन तरुणांची विशेष पोलिस अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. त्यांना दररोज 125 रुपयांचा भत्ता दिला जाणार आहे.
हेही नक्की वाचा : कामगारांसाठी मोठा निर्णय ! नोंदणीकृत कामगारांना दोन टप्प्यात पाच हजार रुपये
ग्राम समितीवरील नियंत्रणासाठी आता 30 जणांचा व्हॉट्सअप ग्रूप
कोरोनाच्या भितीने गावांमध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तींवर नजर ठेवणे, परजिल्ह्यातून तथा परराज्यातून गावात कोणी येणार नाही याची खबरदारी घेणे, गावातून बाहेरगावी जाणाऱ्यांची माहिती संकलित करणे या महत्त्वाच्या कामांसाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गावोगावी ग्राम समित्या स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, समितीचे सदस्य असलेले तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक व विकास सोसायट्यांचे सचिव गावात राहत नसल्याने आपत्ती व्यवस्थापनास अडथळे येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आता ग्राम समितीतील प्रत्येक सदस्यास गावात राहणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करीत जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश पारीत केले. या समितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गावातील व्हॉटस्अप ग्रूप तयार केले जाणार असून त्यांच्यामार्फत तहसिलदार, पोलिस ठाण्याचे अधिकारी नियमित सकाळ, संध्याकाळ माहिती दिली जाईल. गावात न राहणाऱ्या सदस्यांवर कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
हेही नक्की वाचा : फेसबूकवरील पोस्ट पडली महागात ; सोलापुरात गुन्हा
पोलिस अधीक्षकांचे आदेश....
- 3 मेपर्यंत आंतरराज्य अन् आंतरजिल्हा रस्त्यावर आता नो एन्ट्री
- सोलापूर जिल्ह्यातील सीमेवरील 175 गावांमध्ये आता दहा सदस्यांचे ग्राम सुरक्षा दल
- आंतरराज्य व आंतरजिल्हा सरहद्दीवरील गावांसाठी 500 पोलिस अन् तीन आरसीपीच्या तुकड्यांचा बंदोबस्त
- सोलापूर जिल्ह्यात येणारे 212 पैकी 179 आंतरराज्य व आंतरजिल्हा मार्ग लॉकडाउन संपेपर्यंत वाहतुकीसाठी बंद
- बंद केलेल्या रस्त्यांवर त्या गावातील दोन तरुणांची विशेष पोलिस अधिकारी म्हणून नियुक्ती : दररोज मिळणार 125 रुपये
- ग्राम समितीचे सदस्य गावात राहत नसल्याने आपत्ती व्यवस्थापनास अडचणी : समितीच्या सदस्यांवर आता विशेष नियंत्रण
from News Story Feeds https://ift.tt/3cfFSDq
via IFTTT


No comments:
Post a Comment