तळीरामांचा प्रताप; गोदाम फोडून दारू पळवली - Maharashtra Mazaa

Latest

Sunday, April 12, 2020

तळीरामांचा प्रताप; गोदाम फोडून दारू पळवली

https://ift.tt/3ei0NYk
नाशिक: राज्यात लॉकडाऊनमुळे सर्व दुकाने बंद असल्याने तळीरामांची चांगलीच पंचाईत झाली आहे. त्यामुळे दारुच्या दुकानात चोरी झाल्याच्या बातम्या येत असतानाच नाशिकमधील तळीरामांनी चक्क राज्य उत्पादन शुल्क विभागाचं गोदामच फोडून तीन लाख रुपये किंमतीची दारू पळवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राज्य उत्पादन शुल्क विभागाचं एक मजली गोदाम आहे. या गोदामात बेकायदेशीर आणि विनापरवनागी विक्री करण्यात येत असलेल्या दारूचे बॉक्स ठेवण्यात आले आहेत. शहरातील सर्वच दुकाने बंद असल्याने काही चोरट्यांनी या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गोदामालाच टार्गेट केलं आहे. चोरट्यांनी हे गोदाम फोडून गोदामातील सुमारे तीन लाख रुपयाहून अधिक किंमतीचे दारुचे बॉक्स लंपास केले. चोरट्यांनी एक दोन नव्हे तर सुमारे ६८ बॉक्स लंपास केले होते. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम हाती घेऊन दोन जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. या दोन्ही तळीरामांची कसून चौकशी करण्यात येत असून त्यांच्या साथीदारांची माहिती घेण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.



from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3c8Wn4g
via IFTTT

No comments:

Post a Comment