आमदार रवी राणा रुग्णालयात; प्रकृती खालावली - Maharashtra Mazaa

Latest

Saturday, April 18, 2020

आमदार रवी राणा रुग्णालयात; प्रकृती खालावली

https://ift.tt/2XJ8zVv
अमरावती: युवा स्वाभीमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे शनिवारी त्यांना अमरावती येथील रेडीएंट रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासुन लॉकडाऊनमुळे अनेक मजूर बेरोजगार झाल्याने त्यांच्यापर्यंत किराणा पोहचवण्यासाठी आमदार रवी राणा स्वत: घरोघरी गेले होते. यामुळे त्यांना काल अंगदुखीचा त्रास झाला. तसेच त्यांना तापही आल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा नसल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. आमदार रवी राणा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर निष्णात डॉक्टरांच्या चमुने तपासणी करून त्यांच्या रक्ताचे नमुने, युरीन सँपल तपासणीकरीता नागपूर येथे पाठविले आहेत. तसेच राणा अनेक लोकांच्या संपर्कात आल्यामुळे कोरोना तपासणीकरिता त्यांचे थ्रोट स्वॅबसुध्दा तपासणीकरिता पाठविण्यात आले. उद्या त्यांची सोनोग्राफी करण्यात येईल, अशी माहिती रुग्णालय प्रशासनामार्फत देण्यात आली. रेडीएंट हॉस्पीटलचे डॉक्टर आनंद काकाणी, सिकंदर अडवाणी, पवन अग्रवाल आदी डॉक्टरांचे पथक राणा यांच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष देऊन आहे. त्यांच्याकरिता रेडीएंट हॉस्पीटलचा चौथा मजला पूर्णपणे रिकामा करण्यात आला असून या मजल्याचे पुर्ण निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. यावेळी आमदार रवि राणा यांना भेटण्यासाठी सर्वांना मनाई करण्यात आलेली आहे. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकीत्सक शामसुंदर निकम आणि रेडीएंटचे संचालक काकाणी यांनी राणा यांना तपसाल्यानंतर त्यांना विश्रांतीचा दिला होता. परंतू शरीरातील ज्वर कमी होत नसल्यामुळे आज त्यांना तातडीने रेडीएंट रूग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले, अशी माहीती खासदार नवनीत रवी राणा यांनी दिली. दरम्यान, राणा यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा न झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहेत.



from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/34MQFCz
via IFTTT

No comments:

Post a Comment