सोलापूर : लॉकडाउनमुळे साखर निर्यातीवरील बंदी तर देशाअंतर्गत घटलेल्या साखर विक्रीची कारणे पुढे करीत 67 कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एक हजार 593 कोटी 58 लाखांची एफआरपी अडविली आहे. नुकत्याच पार पडलेल्या गाळप हंगामात राज्यातील 142 साखर कारखान्यांनी 505 लाख 47 हजार मे.टन उसाचे गाळप केले होते.
हेही नक्की वाचा : कामगारांसाठी मोठा निर्णय ! दोन टप्प्यात मिळणार पाच हजार रुपये
राज्यातील साखर कारखान्यांच्या गोदामांमध्ये तब्बल 90 लाख मे.टन साखर शिल्लक आहे. दुसरीकडे निर्यात केलेल्या साखरेवरील तब्बल बाराशे कोटींचे अनुदानही केंद्र सरकारकडून अद्याप मिळालेले नाही. तत्पूर्वी, राज्यातील महापूर, अतिवृष्टीमुळे कमी झालेला ऊस आणि घटलेला साखर उतारा, यामुळे गाळप हंगाम महिनाभर लांबणीवर पडला होता. हंगाम संपण्यापूर्वीच राज्यात कोरोना या विषाणूचा धोका निर्माण झाला आणि राज्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आला. त्यामुळे संपूर्ण साखर उद्योग संकटात सापडला आणि बळीराजासमोरील अडचणीत पुन्हा मोठी वाढ झाली. आता लॉकडाउन कधीपर्यंत राहणार अन् एफआरपी कधी मिळणार, याची चिंता बळीराजाला सतावू लागली आहे.
हेही नक्की वाचा : मोठी ब्रेकिंग ! मृत कोरोनाबाधिताच्या मोबाईलवरुन कॉन्टॅक्ट ट्रेसिंग
कामगारांचे चार महिन्यांपासून थकली पगार
राज्यातील 142 साखर कारखान्यांनी मागील गाळप हंगामात उसाचे गाळप केले. महापूर व अतिवृष्टीमुळे विलंबाने सुरु झालेला हंगाम संपण्यापूर्वीच राज्यात कोरोना या विषाणूने पाय पसरला. संपूर्ण देशातील लॉकडाउनमुळे कारखान्यांच्या गोदामांमध्ये तब्बल 90 लाख टन साखर शिल्लक आहे. निर्यात बंद झाली तर देशाअंतर्गत घाऊक विक्रीतही मोठी घट झाली. मागील तीन वर्षांपासून साखर उद्योग अडचणीत सापडल्याने कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळू शकलेले नाही. मागील चार-पाच महिन्यांपासून राज्यातील 40 हून अधिक साखर कारखान्यांमधील 14 हजारांहून अधिक कामगारांचे वेतन आता पुन्हा लॉकडाउनमध्ये अडकल्याची माहिती साखर आयुक्तालयातील सूत्रांनी दिली.
हेही नक्की वाचा : सकाळ ब्रेकिंग ! ...तर थेट बॅंक व्यवस्थापकाविरुध्द गुन्हा
एफआरपी देण्याचे कारखान्यांना निर्देश
राज्यातील 142 पैकी 67 साखर कारखान्यांकडे नुकत्याच पार पडलेल्या गाळप हंगामातील एक हजार 207 कोटी 97 लाखांची एफआरपी प्रलंबित आहे. लॉकडाउन असल्याने आणि साखर शिल्लक असल्याने अडचणीत येत असल्याचे कारखानदारांचे म्हणणे आहे. मात्र, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम तत्काळ वितरीत करावी, असे निर्देश संबंधित साखर कारखान्यांना दिले आहेत.
- मंगेश तिटकारे, सहसंचालक, साखर
हेही नक्की वाचा : ड्रेनेज पाईपमधून कोरोना संसर्गाचा धोका ! वैज्ञानिकांचा अभ्यास सुरु
राज्यातील मागील गाळपाची स्थिती
एकूण साखर कारखाने
142
एकूण उसाचे गाळप
505.47 लाख मे.टन
एकूण एफआरपी
11,633.08 कोटी
प्रलंबित एफआरपी
1593.58 कोटी
गोदामांमध्ये शिल्लक साखर
90.23 लाख टन
from News Story Feeds https://ift.tt/2yf7Ikw
via IFTTT


No comments:
Post a Comment