भाडेकरूंना मोठा दिलासा, पुढील तीन महिने भाडं पुढे ढकलण्याच्या घरमालकांना सूचना - Maharashtra Mazaa

Latest

Friday, April 17, 2020

भाडेकरूंना मोठा दिलासा, पुढील तीन महिने भाडं पुढे ढकलण्याच्या घरमालकांना सूचना

https://ift.tt/eA8V8J

मुंबई - जगभरात कोरोना थैमान घालतोय. अशात अनेक देश लॉक डाऊनमध्ये आहेत. भारत देखील लॉक डाऊनमध्ये आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. अशात सरकारकडून नागरिकांचं जीवनमान सुकर करण्यासाठी अनेक उपाययोजना, अनेक निर्णय घेण्यात येतायत. यामध्ये तुमचा EMI स्थगित करण्याच्या सूचना सरकारने बँकांना दिल्यानंतर बँकांनी त्याविषयी सकारात्मक भूमिका दाखवली. असाच एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलाय. 

मोठी बातमी - कसं समजेल सरकार तुमचे  WhatsApp मेसेजेस वाचतंय का ? व्हाट्सऍपचं नवीन फिचर?

मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये अनेक नागरिक स्वतःचं हक्काचं घर नसल्याने भाडे तत्त्वावर राहतायत. अशात गेले काही दिवस सर्वच कामकाज ठप्प असल्याने अनेकांना घराचं बजेट कसं सांभाळायचं याबाबत चिंता सतावतेय. यात भाड्याच्या घरात राहणाऱ्यांसमोर आता घराचं भाडं कसं द्यायचं हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला. यावर आता सरकारकडून अधिकृत नोटिफिकेशन काढण्यात आलंय. यामध्ये घरमालकांनी घराचं भाडं वसुली पुढील तीन महिन्यासाठी पुढे ढकलण्याच्या सूचना केल्यात. 

Lockdown2.0 : आता एक नाही तीन दिवसांचा जनता कर्फ्यू

राज्यात भाड्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. अशात सध्याच्या आर्थिक अडचणी पाहता भाडेकरूंकडून घरभाडे थकत असल्याचं लक्षात येतंय. म्हणूनच सध्याची  बिकट परिस्थिती पाहता भाडेकरूंना घर रिकामं करण्यास सांगू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

दरम्यान सरकारकडून देण्यात आलेल्या सूचनांमुळे सर्वसामान्यांकडून सर्वसामान्य भाडेकरूंना मोठा दिलासा मिळालाय. 

dont force tenant to pay their rent maharashtra state government issued the notification

  



from News Story Feeds https://ift.tt/3cq7XIj
via IFTTT

No comments:

Post a Comment