औरंगाबादेत करोनाच्या संसर्गानं वृद्धाचा मृत्यू - Maharashtra Mazaa

Latest

Tuesday, April 14, 2020

औरंगाबादेत करोनाच्या संसर्गानं वृद्धाचा मृत्यू

https://ift.tt/2RAP65j
औरंगाबाद: औरंगाबादमध्येही करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. येथील घाटी रुग्णालयात आज, १४ एप्रिल रोजी दुपारी एका ६८ वर्षीय वृद्धाचा करोनाच्या संसर्गामुळं मृत्यू झाला. त्यामुळं औरंगाबादमधील मृतांचा आकडा दोनवर पोहोचला आहे. करोनाची लागण झालेल्या एका ६८ वर्षीय वृद्धाला येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज, मंगळवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत जिल्ह्यात दोन करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे, तर आतापर्यंत जिल्ह्यात २४ करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.



from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3cdvNqP
via IFTTT

No comments:

Post a Comment