म.टा वृत्तसेवा । संगमनेर जिल्हा रुग्णालयातील करोना विषाणू विलगीकरण कक्षातील बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने एका ८० वर्षांच्या आजोबांचा रविवारी मध्यरात्री मृत्यू झाला. मृत आजोबा मूळचे अहमदनगरचे होते. मधुमेह, हृदयाचाही त्रास होत असल्याने शनिवारी (११ एप्रिल) पासून त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तपासणीमध्ये त्यांना सर्दीचे लक्षण आढळून आले होते. त्यामुळे करोना विषाणूच्या प्रादुर्भावाबाबत आरोग्य विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सर्दीच्या रुग्णांनाही करोना संशयित म्हणून उपचार करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार ८० वर्षीय वृद्धालाही जिल्हा रुग्णालयातील करोनासाठीच्या सिंहस्थ इमारतीतील करोना संशयित कक्षात दाखल करण्यात आले होते. रविवारी मध्यरात्री लघुशंकेसाठी ते बाथरूममध्ये गेले आणि तिथं पाय घसरून पडले. त्यामुळे मार लागून ते जागीच बेशुद्ध पडले. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
वाचा:
जिल्ह्यातील करोना संशयिताचा मृत्यू झाल्याने अकोले तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. त्या वृद्धाचा मृत्यू करोना आजाराने झाला का याची तपासणी करण्यासाठी त्याच्या स्वॅबचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतरच काय ते स्पष्ट होणार असल्याचे संगमनेर प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले. मंगळवार सायंकाळपर्यंत रिपोर्ट येणे अपेक्षित आहे. त्यानंतरच त्याला करोनाचा संसर्ग झाला होता की नाही हे समजू शकणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. वाचा:from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2yQOwKf
via IFTTT


No comments:
Post a Comment