बेळगाव - राज्यात 24 तासात नव्या 38 रुग्णांची भर पडली. गुरुवारी (ता.17) 315 रुग्ण होते. त्यामध्ये आज (ता.18) 38 रुग्ण वाढल्यामुळे संख्या 353 झाली आहे. कोरोना संसर्गमुळे 13 जणांचा बळी गेला आहे. 82 जणांची प्रकृती सुधारली आहे. घरी पाठवले आहे.
राज्यात गुरुवारी बाधितांची संख्या 315 होती. आज तब्बल 38 रुग्ण वाढले. बेळगाव जिल्हात गुरुवारी 17 रुग्ण आढळले होते. त्यामध्ये आज आणखी कोणाची भर पडते का? कोणाला लागण होण्याची शक्यता आहे का? याकडे सर्वांच्या नजरा खिळून होत्या. पण, बेळगावात कोणी पॉझिटिव्ह आढळळे नाही.राज्यात बंगळूर चौघे, म्हैसूर चौघे, मंड्या तिघे, बिदर एक, कारवार एक, विजापूर एक, होसपेठ बळ्ळारी सात, चिक्कबळ्ळापूर तिघे, नंजुनगड म्हैसूर आठ आदी जिल्ह्यात मिळून नवीन 38 पॉझिटिव्ह आढळले आहेत.
वाचा - आता बेळगावात या ठिकाणी होणार कोरोनाची तपासणी...
कोरोनाने 13 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये बेळगाव तालुका हिरेबागेवाडीतील वृध्देचा समाविष्ट आहे. विदेशाहून राज्यात परतलेले आणि दिल्ली निझामुद्दिनमधील मरकजहून परत आलेल्यांना कोरोना संसर्ग झाला होता. बाधितांपासून 353 जणांपर्यंत विषाणूचे संक्रमण झाले आहे. चिंता वाढली आहे. लॉकडाऊन व जमावबंदी कडक राबविले जात आहे. प्रादुर्भाव आणि रोग लागण कमी झाली नाही. त्यासाठी हॉटस्पॉट ठिकाणांत हाय अलर्ट, शहर सील केली आहेत.
from News Story Feeds https://ift.tt/34PwoMP
via IFTTT


No comments:
Post a Comment