कारचे टायर केव्हा बदलावे? वाचा ... सविस्तर.... - Maharashtra Mazaa

Latest

Sunday, March 15, 2020

कारचे टायर केव्हा बदलावे? वाचा ... सविस्तर....

कारचे टायर केव्हा बदलावे? वाचा ... सविस्तर....


                             "गाडीचे टायर्स " गेल्या काही वर्षात दुचाकी व चारचाकी चालवणार्या लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास केला. मला भेटलेल्या जवळजवळ 75 % लोकांना गाडीच्या टायर्स ची स्थिती आणी रिस्क याची जाण किंवा यावर कधी विचार केलाय अस जाणवलं नाही बरेच जण एवढी वर्ष किंवा एवढे किलोमीटर्स झाले की बदलणार असं ठरवून टाकतात, मुळात हे पूर्णतः चुकीचं आहे टायर ची झीज ही नुसत्या रनींग मुळेच होते असं नाही तर चुकलेली अलाईनमेंट, रस्त्यांची खराब स्थिती, टायर मधील कमी जास्त एअर प्रेशर, ड्राईविंग ची पद्धत अशा अनेक गोष्टींमुळे होते... ती झीज कमी व्हावी यासाठी 👉🏻 वेळोवेळी अलाईनमेंट वर लक्ष ठेवणे 👉🏻 3 ते 5 हजार किलोमीटर्स नंतर टायर रोटेशन करणेे 👉🏻 जास्त स्पीड मधे टर्न न मारणे 👉🏻 वेळोवेळी निव्वळ ब्रेक्स वर गाडी कंट्रोल करणे टाळाव (शक्य तितकी गीअर मध्ये कंट्रेोल करण्याची सवय असावी) 👉🏻 एअर प्रेशर वर लक्ष ठेवणे 👉🏻 सस्पेनशन खराब झालं असेल किंवा अँगल चेंज झाला तरी एक टायर झीजतो.... मैकेनिक चा सल्ल्याने ते बदलावे. हे आपण करु शकतो... मी एकदा टू व्हीलर वरून मुंबई ते पुणे प्रवास करत होतो एक्सप्रेस वे ला लागलो ( मधे 4/5 कीलोमीटर मध्ये टुव्हीलर अलाऊड आहे) एक बोलेरो 100/110 kmph वेगाने बाजूने गेली दरम्यान एक बारिकसा काळा रबरी तुकडा उडालेला मला दिसला... मला वेगळीच शंका आली म्हणून मी त्याचा पाठलाग सुरु केला. एक टु व्हीलर वाला बोलेरो ला गाठतो म्हणजे काय? त्याने वेग अजुनच वाढवला.... साधारण दीड किलोमीटर हे चालु होतं. मागुन 2/3 कार येत होत्या त्यांना हात दाखवून मी स्लो करायला लावलं आणी बोलेरो ला गाठून त्याला खुणावलं, थांबण्यासाठी. त्याचा लक्षात आलं काहीतरी गडबड आहे व त्याने वेग 60 पर्यंत खाली आणला अन् तेवढ्यात टायर चं अख्खं सोल मागे उडालं आणी मागून येणार्या कार च्या काचेवर आपटलं आणी ऊजव्या ट्रँक मधे असलेली बोलेरो मागचा टायर चं सोल उडाल्यामुळे पूर्ण डावीकडे रेलिंगवर आपटली. स्पीड कमी करायला लावला म्हणून त्यातील 8 लोक सुखरुप बचावले. ड्राईव्हर मात्र थरथरत होता म्हणे देवासारखे भेटलात. 100/110 चा स्पीडला काय झालं असत???? आता मला सांगा रीमोल्ड चे टायर वापरुन त्याने असे किती रु/- वाचवले असतील? मला वाटतं बोलेरो चा टायर मध्ये जास्तीत जास्त 3 ते 3.5 हजार चा फरक असेल रीमोल्ड अन् नव्या टायर मधे. म्हणजे प्रती किलोमीटर जेमतेम 25 पैसे वाचत असावेत. एवढ्याश्या बचती साठी इतकी रीस्क????

                  कारचे टायर केव्हा बदलावे? वाचा ... सविस्तर.... माझ्या माहिती प्रमाणे साधारण इंन्शोरेन्स पाँलिसी मध्ये असा टायर फुटून अपघात झाला तर नुकसान भरपाई सुद्धा मिळत नाही. खराब टायर्स मुळे गाडीचा स्मुथनेस कमी होतो, ग्रीप कमी झाल्याने स्टेबलिटी रहात नाही, सस्पेन्शन कमी जाणवतं, माईलेज कमी होतं (अर्धा ते एक km प्रति लिटर) या सगळ्याचा हीशोब केला तर आपण जे पैसे वाचवतो किंवा याचं गांभीर्य लक्षात न घेता टाळाटाळ वा आळस करतो, त्यापेक्षा खूप जास्त रिस्क घेत असतो किंवा जास्त किंमत मोजत असतो. बरेच मित्र टायर बदल सांगीतलं की छे!!!! 1)अजून एक पाऊस तरी जायला हवा (खरतर ग्रीप ची गरज पावसातच जास्त असते) 2) मी कुठे गाडी पळवतोय? 3) माझ रनींग जास्त नाही 4) टायर वर खर्च करायला माझाकडे पैसे नाहीत ( घसरुन पडल्यास गाडी दुरुस्ती आणी डाँक्टर ला द्यायला मात्र आहेत) 5) तुझ टायर चं दुकान आहे का? की तुला टायरवाले कमीशन देतात? (आता यावर काय बोलावे?) सगळे जण बेफिकीर नाहीयेत. ज्यांना हे सर्व किंवा याहीपेक्षा जास्त माहीती आहे त्यांनी हुह!! हे काय आम्हाला सांगायला नकोय असं न म्हणता जे याबद्दल अनभिद्न्य आहेत त्यांना हे समजाऊन सांगा. माझं टायर चं दुकान नाही, कोणत्याही कंपनीचा मी एजंट नाही! टायर केव्हा बदलावे?
 1) नक्षी च्या गँप मध्ये मार्किंग (बाहेरच्या बाजुला 4/5 ठिकाणी साधारणतः त्रिकोणी खूण असते तिथे नक्षी ला आतमध्ये) असतं, त्या मार्कींग ला नक्षी टेकली की रिस्क स्टार्ट.

 2) अलाईनमेंट खराब असेल तर एक बाजू झीजते तसा टायर वापरु नये.

 3) खूप दिवस वापर नसेल तरी टायर्स हार्ड होतात, तेही वापरु नयेत.

 4)ट्यूब वाले टायर असतील आणी गाडी खूप दिवस एका जागी ऊभी राहिली तर टायर मध्ये एअर येते आणी गाडी हाँबल होते. टायर ला जिथे फुगा येतो तीथे ता फुटू शकतो किंवा तारा बाहेर येतात.

 *5) टायर ला कट्स गेले असतील तरी बदलून टाका गेल्या 10 वर्षात मला ही गोष्ट सिरीअसली घेणारे फारच कमी दिसले. या साठी हा सगळा लेख प्रपंच!! शेयर करायला विसरू नका

तुमच्या मित्रांना मेन्शन करा ...

source whats-app post

No comments:

Post a Comment