राज्यात कलम 144 लागू, अत्यावश्यक सेवावगळता सर्व बंद राहणार - Maharashtra Mazaa

Latest

Sunday, March 22, 2020

राज्यात कलम 144 लागू, अत्यावश्यक सेवावगळता सर्व बंद राहणार

राज्यात कलम 144 लागू, अत्यावश्यक सेवावगळता सर्व बंद राहणार





गेल्या दोन दिवसांपासून प्रादुर्भाव झालेल्यांची संख्या वाढते आहे. ही संख्या लवकरात लवकर थांबवायची आहे.


मुंबईः कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात कलम 144 लागू करण्यात आलं असून, 5 पेक्षा अधिक जण एकत्र आल्यास त्यांना ताब्यात घेण्यात येणार आहे, असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. मध्यरात्रीपासून 144 कलमाची अंमलबजावणी केली जाणार आहे.  पुढे ते म्हणाले, या रोगाच्या प्रादुर्भावाचा काळ आहे. त्यातल्या संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण टप्प्यात पाऊल टाकलेलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रादुर्भाव झालेल्यांची संख्या वाढते आहे. ही संख्या लवकरात लवकर थांबवायची आहे.

म्हणून उद्या सकाळपासून मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूरच नव्हे, तर महाराष्ट्रातल्या नागरी भागात 144 कलम नाइलाजास्तव लावत आहे. कृपाकरून 5 पेक्षा अधिक जण एकत्र येऊ नका. गर्दी करू नका, टोळकं किंवा ग्रुपनं कुठे फिरू नका. आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका. परदेशातून आता आपल्याकडे कोणी येणार नाही. आता आपले आपणच आहोत. आपल्यालाच या संकटावरती मात करायची आहे.


-करोना बद्दल आधिक माहीती-

आधिक माहीतीसाठी खालील दिलेल्या लिंक वर अथव फोन नंबर वर संपर्क करा - 
Further details are awaited.

Referral Sites for the News are :

https://arogya.maharashtra.gov.in/

https://mohfw.gov.in/

Maharashtra

020-26127394

Indian Govt. helplines 
Central helpline number: +91-11-23978046

Please take help of above contact for further details.

No comments:

Post a Comment